Encroachment Clearance Department personnel lifting a two-wheeler from Nehru Chowk to Ghanekar Chowk road
Encroachment Clearance Department personnel lifting a two-wheeler from Nehru Chowk to Ghanekar Chowk road  esakal
जळगाव

Jalgaon News : अतिक्रमणधारक बिनधास्त, दुचाकीचालकांवर संक्रांत!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या दुचाकीधारकांना महापालिका व शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. नेहरू चौक ते घाणेकर चौक मार्गावरील दुचाकी उचलून जप्त केल्या. त्यामुळे वाहधाकरांनी संताप व्यक्त केला. (Two wheelers from Nehru Chowk to Ghanekar Chowk were picked up and seized by municipality jalgaon news)

मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी हातगाड्या लावून अतिक्रमण केले. त्यांना मात्र अभय दिले जात आहे. दुसरीकडे वाहन पार्किंगची कोणतीही सुविधा न करता दुचाकींवर कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शहरात महापालिकेने रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकींवर धडक कारवाई केली. नेहरू चौक ते घाणेकर चौक रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी उचलून जप्त करण्यात आल्या. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ही वाहने नेण्यात आली. त्या ठिकाणी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. नंतर वाहने सोडण्यात आली.

पार्किंगची सोय करा मग

शहरात रस्त्यांवर कुठेही पार्किंगची सुविधा नाही, तसेच महापालिकेने व शहर पोलिसांनी कोणतीही सुविधा केलेली नाही. दुसरीकडे मात्र रस्त्यावर उभी केलेली वाहने जप्त करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नेहरू चौक ते घाणेकर चौक रस्त्यावर मोठमोठी व्यापारी संकुल आहेत. मात्र, त्या ठिकाणी कुठेही वाहन पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे वाहनधारकांनी वाहने कुठे लावावीत, हे आता पोलिस व महापालिकेने सांगण्याची गरज आहे.

पार्किंग नसलेल्या संकुलाचे काय?

महापालिकेने व्यापारी संकुल उभारताना पार्किंगसाठी जागा सक्तीची केली आहे. मात्र, नेहरू चौक ते घाणेकर चौकदरम्यान असलेल्या व्यापारी संकुलांचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात अठरा संकुलात पार्किंगची सुविधा नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

तळमजल्यावर पार्किंग सुविधांच्या जागेवर काढण्यात आलेली दुकाने निष्काषीत करून त्या ठिकाणी पार्किंग सुविधा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेने कोणतीही कारवाई न करता त्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून पुन्हा चौकशी सुरू केली आहे. आता ही चौकशी पूर्ण होऊन पार्किंग सुविधा कधी होणार, याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.

रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना अभय

शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणधारकांना मात्र महापालिकेतर्फे अभय देण्यात आल्याचे दिसत आहे. ज्या रस्त्यावरील दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली. त्याच रस्त्यावर मात्र फळ विक्रेत्यांच्या गाड्या लागल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला त्या दिसल्या नाहीत.

शहरातील इतर रस्त्यांवर फळ व इतर विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा आरोपही नागरिकांकडून होत आहे. रस्त्यांवरील या अतिक्रमणामुळेच वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT