Deputy Mayor Kulbhushan Patil welcoming party chief Uddhav Thackeray on the occasion of Bhumi Pujan ceremony of the proposed Shiv Memorial at Pimprala. Neighboring Mayor Jayashree Mahajan, Rashmi Thackeray etc.  esakal
जळगाव

Jalgaon Uddhav Thackeray : तापमानामुळे जनतेची काळजी, पुतळा अनावरणालाही.. : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उष्माघातामुळे मुंबईत गेल्या आठवड्यात दुर्दैवाने नको ते घडले, त्यामुळे आपण पिंप्राळ्यात जनतेच्या काळजीने त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बोलणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिल्यानंतर तीन महिन्यांनी त्याच्या अनावरणासाठी अवश्‍य येणार आहोत, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिली. (uddhav thackeray statement about Statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled at pachora jalgaon news)

पिंप्राळा येथील उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजननासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्‍मी ठाकरे उपस्थित होत्या.

उन्हामुळे जनतेला त्रास होऊ नये म्हणून या कार्यक्रमास धावती भेट दिली. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्‍मी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ, तसेच स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी रश्‍मी ठाकरे यांचे स्वागत केले. या वेळी त्यांनी उशिरा कार्यक्रमास आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

उन्हामुळे आपण मोठे भाषण करणार नाही, असे स्पष्ट करताना ते म्हणाले, गेल्या आठवड्यात उष्माघातामुळे मुंबईत नको ते घडले. त्यामुळे आपण जनतेची काळजी घेऊन दुपारचा कार्यक्रम घेणार नव्हतो, परंतु ऐकेल तो शिवसैनिक कसला, त्यांच्या आग्रहाखातर आपण या ठिकाणी केवळ उपस्थिती दिली आहे. आपण जनतेची माफी मागतो. परंतु आपण तीन महिन्यांनी या पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनावरणासाठी नक्की येणार आहोत. त्या वेळीही जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशीच वेळ आपण घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT