Unseasonal Rain Crop Damage esakal
जळगाव

Unseasonal Rain Crop Damage : पावणे 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात २९ एप्रिलला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे तब्बल तीन हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. (Unseasonal Rain Crop Damage to crops on 4 thousand hectares jalgaon news)

झालेल्या नुकसानीत केळी, मका, बाजरी, ज्वारी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. पाच हजार ८९३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने जाहीर केला आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतच्या अनुभवानुसार मे महिन्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसतो. यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व वादळ झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ग्लोबल वार्मिंग, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे उन्हाळ्यात पाऊस पडत आहे.

उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे. यंदा अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्याचे तापमान ४० अंशाच्या आतच राहिले. आगामी काही दिवसही पावसाचे असल्याने तापमान ३९ ते ४० अंशापर्यंत राहिले.

जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात तापमान ४४ ते ४५ अंशादरम्यान असते. मात्र, अवकाळी पावसाने तापमानाची तीव्रता कमी करून नागरिकांना दिला असला, तरी पीक, घरांचे नुकसान होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सहा तालुक्यांतील ५ हजार ८९३ शेतकरी बाधित

शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून नेला आहे.

वादळी पावसामुळे बाधित शेतकरी, क्षेत्र

तालुका--शेतकरी--क्षेत्र हेक्टर

अमळनेर --१ हजार ३१६--८३८

पारोळा--३३३--१८०.००

जामनेर--३ हजार ११५--१७२९.६०

पाचोरा--६६--४२

यावल--१६७ --१९०.२०

रावेर--८९६--८९६

एकूण--५८९३--३८७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT