Unseasonal Rain Damage Stormy rain in Raver area damage to banana jalgaon news) esakal
जळगाव

Unseasonal Rain Damage : रावेर परिसरात वादळी पाऊस; घरांचे पत्रे उडाले, केळीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) दुपारी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले तर घरांवरील पत्रे उडाल्यामुळे घरांची पडझड होऊन अनेक कुटुंब रस्त्यावर आली. (Unseasonal Rain Damage Stormy rain in Raver area damage to banana jalgaon news)

बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब वाकले व वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. तहसीलदार बंडू कापसे यांनी आज झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील कैकाडीवाडा येथे मंगळवारी (ता. ३०) दुपारी एकच्या सुमारास वादळी पावसामुळे लिंबाचे झाड कोसळून तीन मोटारसायकलींचे नुकसान झाले. लालमाती (ता. रावेर) येथे देखील घरांची पडझड झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पाटील यांनी तेथे भेट देऊन तहसीलदार कापसे यांना माहिती देऊन पंचनामे करण्यासाठी विनंती केली. नवीन विश्रामगृह, जुना सावदारोड, अष्टविनायकनगर, तिरुपतीनगर, कैकाडीवाडा आदी भागात वीजतारांवर झाड उन्मळून पडल्यामुळे विजेचे तार तुटून पडले.

अनेक ठिकाणी खांब वाकले. लालमाती येथे कॉंग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य रूपाली धनगर, योगेश धनगर, संजय जमादार यांनी गावात नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT