sakal media
जळगाव

700 मुलींना गर्भमुख कॅन्‍सर प्रतिबंधात्‍मक लस

९ ते २१ वर्ष वयोगटातील सातशे मुलींना ही लस देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एचपीव्‍ही नामक विषाणूमुळे उद्‌भवणाऱ्या गर्भमुख कॅन्‍सरच्या प्रतिबंधास उपयुक्त लस गुरुवारी (ता. ७) शालेय मुलींना देण्यात आली. यात ९ ते २१ वर्ष वयोगटातील सातशे मुलींना ही लस देण्यात आली. लायन्स क्लब जळगाव सेंट्रलच्यावतीने मोफत लस देण्यासाठी ७ व ८ जुलै लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. (Latest marathi news)

चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिराचे उद्‌घाटन जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते सकाळी झाले. यानंतर प्रत्‍यक्ष लसीकरणास सुरवात झाली. शिबिरात लायन्स क्लबचे उपप्रांतपाल गिरीश सिसोदिया, रिजन चेअरपर्सन जयेश ललवाणी, झोन चेअरपर्सन उमेश सैनी, कॅन्सर पेशंट ॲंड असोसिएशनच्या संचालिका धनंजया सारनाथ, लायन्स क्लब अध्यक्ष किशोर बेहेरानी, सचिव दिनेश बोरा, कोषाध्यक्ष दिनेश बाफना, प्रोजेक्ट चेअरमन शिरीष सिसोदिया, मनीष मंडोरा, जगदीश जाखेटे आदी उपस्थित होते. सदरील शिबिरात एक हजार मुलींना लस देण्यात येणार असून पहिल्‍या दिवशी सातशे मुलींना लस देण्यात आली. यात सार्वजनिक विद्यालय असोदा, संत बाबा हरदासराम स्कूल, आदर्श सिंधी स्कूल, आर. आर. विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय इत्यादी शाळेतील विद्यार्थिनींना लस देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT