Women officials of Shiv Sena protesting by cooking on the stove due to the high cost of cylinders and Shiv Sena held a rally against inflation at the Collectorate esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हाधिकारी-ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद; कांदा, कापूस घेऊन आणला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेने (Shivsena) शुक्रवारी (ता. ३) दुपारी चारच्या सुमारास कांदे, कापूस, प्रतीकात्मक गॅस सिलिंडर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. (Verbal dispute between Collector Thackeray group leaders due to sudden march brought with onion cotton jalgaon news)

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दोन- तीन पदाधिकारी येताच त्यांना मोर्चाची परवानगी आहे का, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी विचारताच, पदाधिकाऱ्यांनी आताच आणली आहे, असे सांगत, बाहेर उभे असलेले शिवेसेनेचे संजय सावंतसह २५ ते ५० पदाधिकाऱ्यांना सोबत आणले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा संताप झाला.

त्यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी इंग्रजीत संवाद साधला. लागलीच श्री. सावंत यांनीही इंग्रजीत संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नसल्याचे सांगत जिल्हापेठ पोलिस निरीक्षकांना अशाप्रकारचा मोर्चा येणार आहे, असे आम्हाला का कळविले नाही? याबाबत जाब विचारला. पाच मिनिटे परवानगीवरून वाद झाला. नंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना बसवित म्हणणे मांडण्यास सांगितल्याने वाढणारा वाद मिटला.

शुक्रवारी दुपारी शिवसेनेचा मेळावा होता. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे महागाईविरोधात गॅस सिलिंडर व पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.

‘या सरकारच्या (भाजप-शिंदे सरकार) करायचे काय? खाली डोके वर पाय’, ‘शिवसेनेचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘अजब हे सरकार, अजब हे सरकार’, ‘खुर्चीवरच यांचा जीव फार, महागाईन केली हद्दपार’, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणादले होते. कापसाला दर मिळत नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

कांद्याला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दररोज महागाई वाढत आहे. यामुळे नागरिक केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. वाढलेली महागाई कमी करावी, कापसाला चांगला दर मिळावा, कांद्याची खरेदी शासनाने करावी, जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत, शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्याचे पंपाचे वीजबिल माफ करावे.

कापसाला १२००० रुपये हमीभाव द्यावा. अन्यायकारक दरवाढ रद्द करावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. दरवाढीचा व सरकारचा निषेध करीत आहोत, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिवसेनेचे जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (पाचोरा), महिला जिल्हा संघटिका महानंदाताई पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्शल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाधिकारी नीलेश चौधरी, पीयूष गांधी, जिल्हा समन्वयक गजानन महापुरे, डॉ. दीपक राजपूत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT