victim of rape gave birth to baby jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अत्याचार पीडितेने दिला बाळाला जन्म

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रावेर तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाळाला जन्म दिला आहे. (victim of rape gave birth to baby jalgaon crime news)

रावेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडिल ऊस तोडणीचे काम करून उदरनिर्वाह करतात. साधारण सात महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह बारामती तालुक्यातील फलटणजवळ ऊस तोडणीला गेली.

तिथे झोपडी करून वास्तव्याला होते. पीडित मुलगी झोपडीत एकटी असताना, आरज्या (पूर्ण नाव माहिती नाही) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. मुलीने घरात घाबरून कुणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर कुटुंब पुन्हा मुळ गावी परत आले. त्यानंतर पीडितेला त्रास जाणवू लागल्याने तिला रुग्णालयात आणण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तपासणीअंती पीडिता गर्भवती राहिल्याचे समोर आले. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे पीडित मुलीने मुलाला जन्म दिला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT