Members of Jai Yogeshwar group from Dangar Budruk accepting the third place prize at the prize distribution ceremony of the 'Satyamev Jayate' Farmer Cup competition.
Members of Jai Yogeshwar group from Dangar Budruk accepting the third place prize at the prize distribution ceremony of the 'Satyamev Jayate' Farmer Cup competition. esakal
जळगाव

Jalgaon News: ‘सत्यमेव जयते’ फार्मर कपमध्ये ‘डांगर’चा झेंडा! जय योगेश्वर शेतकरी गटाला पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्रातील शेतकरी गटांमध्ये शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेत डांगर बुद्रुक (ता. अमळनेर) येथील गटाला तृतीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. (victory in Satyamev Jayate Farmer Cup of dangar village Awarded to Jai Yogeshwar Farmers Group Jalgaon News)

राज्यातील १८ जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, स्पर्धेत एक हजार ५१६ पेक्षा जास्त शेतकरी गट स्पर्धेत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी गट शेती केल्यामुळे उत्पादनखर्च कमी येईल, तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून अभिनेता आमीर खानने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेची घोषणा केली होती.

एकजूट, ज्ञान, श्रमदान आणि स्पर्धा या मुद्यांवर झालेल्या या स्पर्धेत ४० हजार शेतकऱ्यांनी आपल्या दीड हजार गटांच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. मका, ज्वारी, तूर, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, कांदा, मूग, उडीद अशा विविध २६ पिकांचे उत्पादन या गटांनी आपापल्या गावात घेतले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडासंकुलात ‘सत्यमेव जयते फार्मर कप-२०२२’चा पुरस्कार वितरण सोहळा झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुकच्या जय योगेश्वर शेतकरी गटाला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळाला.

यांनी स्वीकारला सन्मान

या शेतकरी गटात सतीलाल वाघ, राकेश पाटील, पवन नेरकर, राकेश वाघ, समाधान पाटील, प्रवीण पाटील, भटू महाराज, विजय पाटील, भगवान पाटील, उमेश पाटील आदी शेतकऱ्यांचा समावेश होता. या शेतकरी गटाच्या यशाबद्दल डांगर बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT