Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गावठी पिस्तूल विक्रेत्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मध्य प्रदेशातून जळगावात पिस्तूल विक्री करण्यासाठी दोघे आले होते.

अजिंठा चौकातील हॉटेल महाराजा परिसरात दोघे गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. (Village pistol seller arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

त्यावरून त्यांच्या गुन्हेशोध पथकाने अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर संशयित अक्षय प्रकाश घारू (वय २१) व नितीन देवी दयाल सालवे (वय २५, दोन्ही रा. शिवाजीनगर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून २० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल हस्तगत केले. याबाबत पोलिस नाईक विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रामकृष्ण पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT