Market Committee Election
Market Committee Election esakal
जळगाव

Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीची नव्याने होणार मतदारयादी

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीसाठी अहर्ता वाढविण्यात आली असून, नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती आणि

विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सदस्यांचा मतदार (Voters) याद्यांमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. (Voters list will be newly prepared for market committee elections jalgaon news)

नागपूर खंडपीठाने ३० एप्रिलपर्यंत बाजार समित्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने प्रक्रियेला पुन्हा वेग आला आहे. मात्र यापूर्वी मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची अहर्ता १ सप्टेंबर २०२२ होती. ज्यांची नावे मतदार यादीत आहेत,

तेच निवडणुकीसाठी पात्र ठरत असल्याने नव्याने निवडून आलेल्या सदस्यांवर अन्याय होऊन ते निवडणुकीसाठी अपात्र ठरणार होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत आणि विकासो सदस्यांची नावे बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

१० ते २४ फेब्रुवारीपर्यंत नावे समाविष्ट केली जाणार आहेत. जुनी नावे वगळून नवी समाविष्ट केली जातील व २७ ला सुधारित मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ८ मार्चपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत. ८ ते १७ मार्चपर्यंत हरकतीवर निर्णय देऊन २० मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT