Workers pouring water from a tanker into a well acquired to supply water to the village.  esakal
जळगाव

Water Scarcity : पाणीटंचाईची तीव्रता वाढली; 2 गावांना टँकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. सद्यःस्थितीत चार गावांमधील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

उन्हाची तीव्रता अद्यापही कायम असल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य व जपून वापर करावा, असे आवाहन पंचायत समिती प्रशासनाने केले आहे. (Water supply to 2 villages by tanker in parola jalgaon news)

तालुक्यात एकूण ११४ खेडी असून दरवर्षी उन्हाळ्यात काही ठरावीक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही वेळा पशुधनासाठी देखील पाणी जवळपास उपलब्ध नसते. तालुक्यातील बऱ्याच गावांना पाण्याचा कोणताही नैसर्गिक स्रोत उपलब्ध नाही.

त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्यानंतर या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासते. त्यामुळे अशा गावांमधील ग्रामस्थांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. सद्यःस्थितीत तालुक्यातील तामसवाडी धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाली आहे.

याशिवाय चार गावांतील विहिरी अधिग्रहण करून तेथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. तालुक्यातील खोलसर, कराडी, मोहाडी व पोपटनगर या चार गावांमधील ज्या विहिरींना सध्या चांगले पाणी आहे, त्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर हनुमंतखेडे व खेडीढोक या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हनुमंतखेडे गावात तीन फेऱ्या तर खेडीढोक येथे टँकरच्या दररोज चार फेऱ्या केल्या जात आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता संदीप सोनवणे यांनी दिली. दरम्यान, महाळपूर (ता. पारोळा) येथील एका विहिरीच्या अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव आला असून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

तालुक्याच्या ज्या गावांमध्ये पाणीटंचाई भासत असेल, तर अशा गावांनी प्रस्ताव पाठवावेत व पाण्याचा सर्वांनी जपून वापर करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार लोंढे यांनी केले आहे.

धरणात अत्यल्प पाणीसाठा

तालुक्याला वरदान ठरलेल्या बोरी (तामसवाडी) धरणात सद्यःस्थितीत अत्यल्प पाणीसाठा आहे. बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र ६३९.८ चौरस किलोमीटर असून धरणाची पूर्ण पातळी क्षमता ४०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणाची केवळ २६२.८३ मीटर पाण्याची पातळी आहे. धरणातून यापूर्वीच पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

त्यामुळे आता केवळ शहरवासीयांना पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही, तरी धरणातील उपलब्ध पाण्यावर पारोळेकरांची तहान सहज भागू शकते. मात्र, तालुक्यातील टंचाईसदृश्‍य गावांचा पाणीप्रश्‍न दूर होण्यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यात धरण क्षमतेने भरणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT