fraud crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चक्क! विवाहितेला अविवाहित दाखवून लावला विवाह!

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : विवाहित महिलेला ती अविवाहित आहे, असे खोटे भासवून तिचा तरुणासोबत न्यायालयात विवाह लावून देत, तरुणाकडून एक लाख रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (wedding of married women shown to be unmarried Fraud case registered Jalgaon Crime News)

याबाबत माहिती अशी, शहापूर (जि. बऱ्हाणपूर) योगेश संतोष महाजन (वय २५) याचा विवाह जया (खरे नाव निकिता) हिच्याशी लावून देण्यासाठी त्याच्याकडून संशयित आशाबाई ठाकरे व इतरांनी एक लाख रुपये घेतले. जया ही विवाहित असतानाही ती अविवाहित असल्याचे खोटे भासवले. फिर्यादी योगेश महाजनचा विश्वास संपादन करून त्याचा भुसावळ न्यायालयात जयासोबत (खरे नाव निकिता) विवाह लावून दिला. जिच्याशी आपले लग्न झाले, ती अगोरदच विवाहित असल्याचे फिर्यादी योगेशच्या लक्षात आल्यानंतर आपला विश्‍वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी त्याने शहर पोलिसात फिर्याद दिली.

त्यावरुन संशयित अतुल गुर्जर (रा. रसलपूर, ता. रावेर), आशाबाई भगवान ठाकरे (रा. कंडारी, ता. भुसावळ), विठ्ठल श्यामराव काकडे (रा. पळशी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), निकिता पिता सुधाकर सोंळके (रा. कानोली, ता. दर्यापूर, जि. अमरावती) या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना रविवारी (ता. १८) अटक करण्यात आली असून इतरांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, सध्या विवाहोच्छूक मुलांना मुली मिळणे कठीण झाल्यामुळे त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारची फसवणूक करणारे एजंट चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

Latest Marathi News Live Update : नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणूक बिनविरोध, भाजपकडेच तिजोरीच्या चाव्या

BMC Budget: राज्याने थकविले १५ हजार कोटी, महापालिकेची आता ठेवींवर मदार

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

SCROLL FOR NEXT