Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मोफत जागा असताना साडेचार कोटींचे भूसंपादन; जनतेच्या पैशांचा अपव्यय!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बगीचा (Garden) करण्यासाठी महापालिकेकडे मोकळी जागा त्याच भागात उपलब्ध असताना त्याच्याऐवजी तब्बल चार कोटी रुपये खर्च करून नवीन भूसंपादन करण्यात आले. (while Municipal Corporation had available space in same area for making garden new land was acquired by spending 4 crore rupees jalgaon news)

आधीच्या दोन बगीचांसाठी असलेल्या जागांचा विनियोग न करता पुन्हा त्याच प्रयोजनासाठी नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी कोणाच्या हितासाठी, असा प्रश्‍न महापालिका आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत केलेला आहे.

शहरातील रामानंदनगरच्या उजव्या बाजूला व आशाबाबानगर येथे असलेल्या आरएमएस कॉलनीशेजारी गट क्रमांक ११५/३, ११५/५ व १५५/६ या तीन जागा महापालिकेने बगीचासाठी संबंधित विकासकाला टीडीआर देऊन भूसंपादित केल्या आहेत. या भागात बगीच्या करण्यासाठी महापालिकेने ११५/५ ही तब्बल ५,३०० चौ. मी. जागा ३० एप्रिल २०१४ ला टीडीआर देऊन घेतली आहे. ११५/३ व ११५/६ या दोन

जागाही २०१९ मध्ये टीडीआर देऊन घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, या जमिनी महापालिकेने एकही रुपया देऊन घेतलेल्या नाहीत. ज्या बगीच्या विकसित करण्यासाठी या जागा घेण्यात आल्या होत्या त्यानुसार त्या ठिकाणी महापालिकेने बगीचा विकसित करणे गरजेचे होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

महापालिकेने या जागांबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र २०२२ मध्ये महापालिकेने शहरापासून बाहेर असलेल्या व रेल्वेरुळापासूनजवळ असलेली गट क्रमांक १२५ ही जागा चार कोटी ५० लाखांत संपादित केली आहे. आता ही जागा बगीच्यासाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बगीच्यासाठी जी जागा आरक्षित केली, त्याचा आरक्षण क्रमांक ११२ असताना महापालिकेने त्याच ठिकाणी गट क्रमांक १२५ असून या जागेची महापालिकेला काय गरज होती. बगीचा तयार करण्यासाठी अगोदरच तीन जागा टीडीआर देऊन घेण्यात आल्या असल्याची माहिती असूनही पुन्हा साडेचार कोटी रुपये खर्च करून खरेदी का करण्यात आली, हा प्रश्‍नच असल्याचे दिसून येत आहे.

कोणाच्या तरी आर्थिक हितासाठी हा जमिनीच्या भूसंपादनाचा खेळ करण्यात आल्याचा संशय महापालिका आयुक्तांकडे जळगावातील नागरिक अतुल मुंदडा यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. नागरिकांकडील कररूपी पैशांचा वापर कोणाच्यातरी फायद्यासाठी केला जात असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे भूसंपादन रद्द करून नागरिकांचा पैसा विकासासाठी वापरावा, अशी मागणीही मुंदडा यांनी केली आहे.

"महापालिकेकडे तीन जागा बगीचासाठी असताना व त्यासाठी एकही पैसा द्यावा लागलेला नसताना पुन्हा मोठी रक्कम देऊन भूसंपादनाचा घाट कशासाठी घातला जात आहे. नागरिकांच्या पैशांची ही उधळपट्टी कोणाच्या हितासाठी आहे, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळायला हवी." - अतुल मुंदडा, नागरिक, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT