Eknath Shinde Devendra Fadnavis  esakal
जळगाव

Eknath Shinde Gat : मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कुणाची वर्णी लागणार?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे लवकरच विस्तार होण्याचे संकेत आहेत.

जळगाव जिल्ह्यातून शिंदे गटातील आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील व लता सोनवणे यापैकी कुणाला संधी मिळणार, याकडे आता लक्ष लागून आहे.(who will get chance from Shinde group for cabinet expansion List prepared Jalgaon news)

दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मंत्री मंडळाच्या विस्तारावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटातून मंत्रिमंडळात कुणाला संधी देण्यात येईल, याची यादीही तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव जिल्ह्यातून चांगली साथ मिळाली आहे. शिवसेनेचे चारही आमदार फुटले. शिवाय पाठिंबा देणारे आमदारही सोबत गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात विधानसभेत शिवसेना शून्य झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या टप्प्यात तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे जुनेच खाते राहिले. विस्तारात आणखी एकाला संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, की चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटचे आहेत. अनेकवेळा त्यांच्या आमंत्रणावरून मुख्यमंत्री शिंदे पाचोरा येथेही आले आहेत. मुख्यमंत्री बनण्यासाठी पाचोऱ्यातील एका देवस्थानाचा कौलही घेण्यासाठी श्री. शिंदे अचानक आले होते.

आमदार किशोर पाटील यांचे त्यांना सहकार्य होते. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील शिवसेनेचे सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. शिवसेनेत असताना मंत्रिपद मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना मिळाले नाही.

शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या टप्प्यात चिमणराव पाटील होते. त्यामुळे आता त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा असून, त्यांचे नावही चर्चेत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे जिल्ह्यातील दुसरे मंत्री कोण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT