Cold Cough Patient Increase esakal
जळगाव

Winter Season : सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले; 3 दिवसांत 200 रुग्णांची तपासणीची नोंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीचे पर्व संपताच थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान १६ ते १८ अंशापर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम वातावरणावर होऊन सर्दी, खोकल्यांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागात तीन दिवसांत २०० पेक्षा अधिक रुग्ण सर्दी, खोकल्याचे होते. तर १७० बालकेही सर्दी, थंडी, वायलर इन्फेकशनने बेजार झाल्याचे दिसून आले.

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या १०९ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पावसाचा जोर अधिक होता. यामुळे रब्बीचा हंगाम चांगला येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे पावसाळा जाऊन हिवाळी सुरू होताच ऋतू बदलाचा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे. पहाटे पाच ते सकाळी सातपर्यंत थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिक स्वेटर, कानटोपी, हातमोजे, जॅकेट घालून सकाळी फिरायला जाताना दिसत आहेत. सध्या शाळा बंद आहेत. मात्र शाळकरी मुले ट्यूशनला जाताना स्वेटर, कानटोपी अवश्‍य घालत आहेत.(Winter Season Cold Cough patients increased Examination record of 200 patients in 3 days Jalgaon News)

ऋतू बदलताच वातावरणातील गारवा वाढून सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. खासगी डाक्टरांकडे सकाळी दहापासून रात्री उशिरापर्यंत तपासणीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. लहान मुले, वृद्धांना थंडीचा अधिक त्रास होतो. यामुळे त्यांना गरम कपडे घालायला देणे, अन्न गरम देणे, सतत गरम पाणी पिण्यास देण्याची गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

"थंडीचा सीझन सुरू झाल्याने बालके, वृद्धांची अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यांना गरम अन्न खाण्यास देणे गरजेचे आहे. फ्रीजमधील फळे, अन्न, आईस्क्रीम खाणे टाळले पाहिजे. गरम कपड्यांचा वापर त्यांना करावयास लावणे गरजेचे आहे; अन्यथा सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. दोन दिवस ताप सतत आल्यास वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.

डॉ. गिरीश राणे, बालरोग विभागप्रमुख, जीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT