Shivsena Esakal
जळगाव

Shivsena: सुरेश जैन ठाकरेंसोबत की शिंदेंसोबत? गुलाबराव पाटलांच्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

सुरेश जैन हे गेले अनेक वर्षे ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत

सकाळ डिजिटल टीम

माजी मंत्री सुरेश जैन ठाकरे गटात राहणार की शिंदे गटात जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी जळगावमध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बॅनर लावले आहेत. तर या बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि गुलाबराव पाटील यांचे फोटो आहेत.

सुरेश जैन हे गेले अनेक वर्षे ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र आता गुलाबराव पाटील यांनी लावलेल्या बॅनरमुळे सुरेश जैन शिंदे गटात जाणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे. सुरेश जैन हे फक्त जळगावमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरातील राजकारणावर घट्ट पकड आहे. त्यामुळे आता सुरेश जैन शिवसेनेच्या कोणत्या गटकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना 30 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. जैन यांना 31 ऑगस्ट 2019 रोजी धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

Shocking News : घरात धार्मिक कार्य, पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी तरुणीने खाल्ल्या गोळ्या, दुर्देवी मृत्यू

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

SCROLL FOR NEXT