jalgaon news esakal
जळगाव

बिबट्याच्या भितीने नदीत उडी मारली अन्... लताबाईंचा अंगावर रोमांच आणणारा प्रवास

प्रा.हिरालाल पाटील


कळमसरे (जि. जळगाव) : म्हणतात ना ,"देव तारी त्याला कोण मारी" असाच काहीसा अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी (वय, 50 )यांच्या बाबतीत संपूर्ण खान्देश करांना आला आहे.

जीव वाचवायला ती पोहली 60 किमी...

याबाबत सविस्तर वृत्त असे की,चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी ह्या शुक्रवारी ता.9 रोजी तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या.तसा चोपडा तालुका म्हटलं म्हणजे पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित.अशातच लताबाई यांच्या नजरेस पडेल ते भयावह दृश्य, पहाते तर काय चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला. अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने त्यांनी तेथुन नदीच्या दिशेने वाटचाल करीत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली. (नदीकाठी गाव असल्याने साहजिकच त्यांना थोडे पोहता येत होते.)

डोळ्यासमोर एकच प्रश्न की बिबट्याच्या तावडीतून जीव कसा वाचेल; सुमारे 60 किमी लताबाई कोळी ह्या पाण्याचा प्रवाहात वाहत वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर दुसऱ्या दिवशी नाविकांना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या. लताबाई यांनी आपबीती कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले.त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढील उपचारार्थ अमळनेर ला हलीवले व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना पाचारण करून स्वाधीन केले.

केळीच्या खोड्याच्या आधाराने काढली रात्र
लताबाई पाण्याच्या प्रवाहात वाहत येताना पाडळसरे धरण ओसंडून वाहत असताना केळीचे खोड हाताला लागल्याने त्याचा आसरा घेत ती रात्री निम शिवारात काठालगत आसरा घेत पाण्यातच रात्र काढली. ता.10 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास निम मांजरोद दरम्यान नाव चालवणारे शंकर कोळी यांना नजरेस पडले असता त्यांनी निम येथील ग्रामस्थांच्या मदतीने लताबाई यांना बाहेर काढले.मात्र त्या पूर्णता गलीत गात्र झालेल्या होत्या. त्यांच्यावर मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले. सुमारे 14 ते पंधरा तास पाण्यात वाहत येत केळीच्या खोड्याच्या आधाराने त्या सही सलामत बाहेर पडल्या.

धाडसी लताबाई यांच्या धैर्यची चर्चा सर्वत्र
सोशल मीडियावर ही चर्चा आता जिल्ह्यात नाही तर राज्यभरासह देशात माहिती पडल्याने काळजाचा ठोका चुकविनारी ही घटना ऐकणारायला सुरुवातिला धक्का देत आहेच. मात्र लताबाई यांचा हा पाण्यातला संघर्ष पाहून धैर्यशील या महिलेला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी उत्सुकता लागलेली पाहवयास मिळत आहे.
दरम्यान सायंकाळी ते रात्र व सकाळ पर्यंत सुमारे पंधरा तास पाण्याच्या प्रवाहात वाहत येत मरणच्या दाढेतून परत आल्याने त्यांचे धैर्य खरोखर धाडसी महिलेचे असल्याने त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT