Women Makeover
Women Makeover esakal
जळगाव

Jalgaon News : ‘अपनी झलक... सबसे अलग...’साठी तरुणींची पसंती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सुंदर दिसण्यासाठी युवतींसह महिलांचा ब्यूटिपार्लरमध्ये जाण्याचा कल प्रचंड वाढला आहे. कुठलाही छोटा-मोठा कार्यक्रम असला, तरी ब्यूटिपार्लरमध्ये जाऊन आपला चेहरा अधिक आकर्षक दिसावा, यासाठी मेकअपवर हजारो रुपये खर्च केले जातात. सध्या ‘वॉटरप्रूफ मेकअप’चा ट्रेंड असून, युवती व महिलांचा त्याकडे सर्वाधिक कल दिसत आहे.

जळगावात सुमारे बाराशेच्यावर लहान-मोठे ब्यूटिपार्लर असून, यातील बहुतांश कोणाचे लक्ष वेधायचे असेल, तर सौंदर्य हा एकमेव उत्तम उपायांमध्ये गृहीत धरला जातो. सौंदर्य उपचार, मेकअप आणि त्यासाठी लागणारी प्रसाधने नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. (women makeover ratio increased many women like waterproof makeup Jalgaon News)

सुंदर दिसण्यासाठी...

करमणूक उद्योगातील भरभराट, मॉडेलिंग, तसेच फॅशन क्षेत्रात अधिकाधिक स्पर्धा असल्याने चांगल्या ‘लूक’ची मागणी आधीपासूनच होती. पूर्वी सौंदर्य प्रसाधनांचा वापर चित्रपट आणि मॉडेलिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्हायचा. मात्र, आजकाल त्याच्या वाढत्या जाहिरातीमुळे सर्वसाधारणांसाठी हा फक्त चर्चेचा विषय राहिला नसून स्रियांच्या रोजच्या वापराचा भाग बनला आहे. एवढेच नव्हे, तर या जाहिरातींनी स्त्रियांना त्यांच्या लूकबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे.

व्यावसायिक कलाकार

आजच्या दैनंदिन जीवनात मेकअप करणारा कलाकार फक्त कलाकार राहिला नसून त्याला व्यायवसायिक कलाकार म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. हाच कलाकार एखाद्या व्यक्तीचे स्वरूप बदलण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करून आपणास एक सुंदर रेखीव स्वरूप देतो. जळगाव शहरात तब्बल एक हजार २४७ ब्यूटिसलून आहेत. मेकअप करताना आपण कोणती प्रसाधने वापरतो आणि का वापरतो, कोणते मेकअप प्रॉडक्ट कधी वापरायचे आणि कधी नाही, या सर्व बाबी आज महत्त्वाच्या ठरतात.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मेकअप टिकण्यासाठी...

हिवाळ्याचे दिवस असले, तरी जळगाव शहरातील उष्णता कमी होण्याचे नाव काही घेत नाही. एवढेच काय कोणताही मोठा सण असो वा लग्न सोहळा कडकडाडीचे ऊन असतेच. या उन्हात आपण स्वतः केलेला मेकअप असो किंवा सौंदर्य कलाकाराने केलेला मेकअप हा कार्यक्रमाच्या मध्यंतरी उरतोच. मेकअप उतरण्याचे कारण काहीही असू शकते. कधी शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे येणारा घाम असेल किंवा अजून काही. मुद्याचे हे असते, की अशावेळेत आपण आपला मेकअप टिकवण्यासाठी वापरण्यात येणारी सौंदर्य प्रसाधने. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची प्रसाधने मिळतात, पण कोणते प्रसाधन कधी वापरायचे, हे माहीत असणेही गरजेचे असते.

वॉटरप्रूफ मेकअप

पाण्याला प्रतिकार करणे किंवा हलविणे नाही, पाणी-प्रतिरोधक (वॉटर रेसिस्टंट) मेकअप एका बिंदूपर्यंत पाण्याच्या प्रवेशास प्रतिकार करू शकतो. मात्र, शेवटी एकवेळ नंतर निघून जातो. दुसऱ्या बाजूला वॉटरप्रूफ मेकअप केल्यावर तुमचा मेकअप हलण्याची काळजी न करता तुम्हाला समुद्राच्या लाटांनी चेहऱ्यावर चापट मारली, तर तो खराब होत नाही. या प्रॉडक्ट्सची किंमत दोन ते २० हजार रुपये आहे. वॉटरप्रूफ मेकअप तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी तयार करतो.

असे आहेत सर्वसाधारण दर (वधू)

साधारण वॉटरप्रूफ मेकअप : दोन ते तीन हजार

ग्लॉसी मेकअप (पार्टी लूक) : सहा ते आठ हजार

न्यूड मेकअप : चार ते पाच हजार

बोल्ड मेकअप : तीन ते १५ हजार

"जळगाव शहराचे वातावरण पाहता आमच्या येथे येणारे सर्व ग्राहक वॉटरप्रूफ मेकअपचीच मागणी करतात. आज सर्वत्र वॉटरप्रूफ मेकअपचा ट्रेंड सुरू आहे. सर्वसाधारणपणे महिला त्यांच्या परंपरेनुसार, तसेच कुठल्या कार्यक्रमाला जायचे आहे, त्यानुसार मेकअप करण्याचा आग्रह धरतात."

-प्रीती निकम, संचालिका, प्रीती ॲन्ड जय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT