crime  esakal
जळगाव

Jalgaon News : जिम बांधकामाला विरोध करणाऱ्या महिलांना पैलवांनाची दमदाटी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तांबापुरा येथे जिमच्या बांधकामास विरोध करणाऱ्या चार महिलांना (Women) शिवीगाळ करून धमकी देण्यात आली. (Women who are opposing the construction of gym are Abused threatened jalgaon news)

तांबापुरा येथे सार्वजनिक शौचालयाच्या जागी जिमचे बांधकाम केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर बुधवारी (ता. १५) दुपारी अडीचच्या सुमारास संगीता जाधव यांच्यासह उज्ज्वला गौतम सुरवाडे, छाया वसंत सुरवाडे, लताबाई अशोक वैराट त्या जागी गेल्या.

त्याठिकाणी तांबापुऱ्यातील नासीर लसूणवाला व आसीफ डल्ला यांना येथे जिम बांधता येणार नाही, असे म्हटले. त्याचा राग आल्याने नासीर व आसिफ यांनी महिलांना शिवीगाळ केली, तसेच ‘आम्ही येथेच जिम बांधू ,तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत धमकी दिली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

याबाबत संगीता जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत नासीर लसूणवाला व आसीफ डल्ला (रा. सहान मशिदीजवळ, तांबापुरा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक नितीन पाटील करीत तपास आहे.

महापालिकेचे तुघलघी फर्मान

जळगाव महापालिका कार्यक्षेत्रात शासनाने प्रत्येक घराबाहेर शौचालय मंजूर केले आहे. परिणामी, सार्वजनीक शौचालयाची आवश्यकताच नाही, तसेच महापालिकेस शौचालयांच्या सफाईचा खर्च पेलत नसल्याने सर्व सार्वजनिक शौचालय तोडण्याचा तुघलघी फर्मान प्रशासनाने दिले होते. त्याचाच परिपाक म्हणून तांबापुऱ्यातील शौचालय तोडून त्या जागी जीम बांधण्यात येत आहे. मात्र, त्याला परिसरातील महिलांचा विरोध असल्याने संघर्ष वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT