Work in Treasury office even on holidays due to march ending  esakal
जळगाव

Jalgaon News : मार्च एडिंगची कामे वेगात; कोशागार कार्यालयात सुटीच्या दिवशीही कामे!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असलेल्या मार्च महिन्यात आर्थिक वर्षातील ताळेबंद, नफा- तोटा पत्रक तयार केले जाते.

शासकीय विभागांकडे आलेला निधी खर्च करण्यासाठी धावपळ या महिन्यातच सुरू असते. (Work in Treasury office even on holidays due to march ending jalgaon news)

मार्चअखरेची आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी (ता. २५) सुटीच्या दिवशीही जिल्हा कोशागार कार्यालयासह विविध विभागांतील अकाउंट विभागातील कर्मचारी कार्यरत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

यंदा १४ मार्चपासून शासकीय कमचाऱ्यांच्या संपामुळे सर्वच शासकीय विभागातील कामे ठप्प झाली होती. जिल्हा कोशागार कार्यालयात सुमारे एक हजार फाइल्स पडून होत्या. त्यावर कशाप्रकारे कामे करायची, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांपुढे होता. मात्र २० मार्चला संप मागे घेण्यात आल्याने शासकीय कार्यालये पुन्हा गर्दीने गजबजली आहेत.

मार्चअखेरची कामे सर्वत्र सुरू आहेत. संबंधित विभागातील अकाउंट विभाग, तालुकास्तरावरील कोशागार कार्यालये, जिल्हा कोशागार कार्यालय, जिल्हा परिषदेचा अकाउंट विभाग, महापालिकेच्या अकाउंट विभागात शनिवारीही कामे सुरू होती. तर रविवारीही (ता. २६) कार्यालये अकाउंटच्या कामांसाठी सुरू असणार आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

संप मिटल्याने कोशागार कार्यालयातील सहाशे फाइल्सवर काम करून त्यांचा निपटारा करत संबंधित विभागांची बिले अदा करण्यात आली आहेत. ३१ मार्चच्या सायंकाळी सहापर्यंत कोशागार कार्यालयात बिले स्वीकारली जातील. रात्री अकरापर्यंत ती अदा करण्याची कामे करण्यात येतील.

पाच अतिरिक्त अधिकारी येणार

विविध विभागांच्या फायलींचा निपटारा करण्यासाठी नाशिक येथील लेखा व वित्त विभागातील पाच अधिकारी सोमवार (ता. २७)पासून जिल्हा कोशागार कार्यालयात येणार आहेत. यामुळे उर्वरित फाइल लवकर निकाली निघतील, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी श्री. गुंजाळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT