Death News esakal
जळगाव

Jalgaon : Truck Reverse घेताना हमालाचा मृत्यू; MIDCत अपघात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एमआयडीसीत ट्रक मागे घेत असताना, अंगावरून गेल्याने हमालाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गुरुवारी (ता. १७) अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भगवान पाशिया मीणा (वय २०) आणि त्याचा काकाचा मुलगा ईश्वर मेगवाल (२२, दोघे रा. कुनटा तहसील, जि. प्रतापगड, राजस्थान) जळगाव एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये गिरनार ट्रान्सपोर्टसमोर मोकळ्या जागेत हमालीचे काम करतात. (Worker Dies Taking Truck Reverse Accident at MIDC Jalgaon News)

गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास भगवान मीणा आणि त्याच्या काकाचा मुलगा ईश्वर मेगवाल गिरनार ट्रान्सपोर्टसमोरील मोकळ्या जागेत झोपले असताना, अज्ञात ट्रकचालकाने ट्रक रिव्हर्स घेत असताना, दोघांच्या अंगावरून ट्रक नेला.

यात भगवान गंभीर जखमी झाला, तर त्याचा काकाचा मुलगा ईश्वर मेगवाल याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भगवान मीणा यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय बडगुजर तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT