Different works of art in bottles. esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्याने बाटलीत साकारल्या अनेक कलाकृती! अरुण पाटील यांचा आगळावेगळा छंद

वासुदेव चव्हाण

Jalgaon News : नैसर्गिक प्रतिभेचं देणं कसं आणि कुणाला लाभेल, हे सांगताच येत नाही. मोराड (ता. जामनेर) या लहानशा गावातील शेतकऱ्याने साकारलेले कलाविष्कार पाहिले तर क्षणभर कुणाचाही डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

एक लिटर पाणी मावेल, अशा लांब आणि निमुळत्या बाटलीत अरुण पाटील यांनी अत्यंत व्यवस्थित अशी खाट तयार करून ती बाटलीतच विणलीही आहे. (works of art created by farmer in bottle jalgaon news)

तसेच, सुबक आणि रेखीव अशी नांगर व ‘वखरा’ची प्रतिकृती तयार करून नांगर, वखरही बाटलीतच वेतून दाखविण्याची कला साधली. बाटलीत चेंडू तयार करून त्याला पेंटिंग व रईसुद्धा तयार केली आहे. यासाठी छत्रीची तार, एक छोटी काडी, एक नट व हातपकडच्या सहाय्याने ते या कलाकृती साकारतात.

चोपन्नवर्षीय श्री. पाटील यांना तरुण वयापासूनच वेगवेगळे छंद असून, स्थापत्य किंवा कारागिरी म्हणता येईल, अशा कलेची जन्मदत्त देणगी लाभली आहे. तरुण वयात पाटील हे धान्य गाळण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या गाळण्या तयार करायचे. सुरुवातीला छंद आणि नंतर त्यांनी या कामाला व्यवसायाचे स्वरूप दिले. या व्यवसायातून त्यांना चांगली कमाई मिळत होती.

या कमाईतूनच बहिणीच्या विवाहासाठी त्यांनी खर्च केल्याचे सांगितले. मात्र, पुढे सामाजिक प्रतिष्ठेला गाळण्या बनविण्याचा व्यवसाय शोभत नाही, असे नातेवाइकांकडून सांगितले जात असल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद केला.

पाटील यांनी या कलाकृती खानदेश महोत्सव- जळगाव, कृषी प्रदर्शन- पुणे व वसंत महोत्सव- नागपूर येथेही मांडल्या होत्या. तेव्हा त्यांना विविध प्रमाणपत्रे मिळाली असून, त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

ज्यांना ही कला शिकण्याची आवड आहे, त्यांना पाटील हे प्रत्येक रविवारी मोफत याविषयीचे प्रशिक्षण देतात. मात्र, हे काम अवघड वाटत असल्याने तरुणांचा या कलेविषयी निरुत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT