Death News esakal
जळगाव

Jalgaon : वीजखांबावरून पडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वीजखांबावर दिवा दुरुस्तीसाठी चढलेला तरुणाचा तोल जाऊन कोसळल्याची घटना २७ सप्टेंबरला घडली होती. या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी (ता. ४) दुपारी मृत्यू झाला.

चंद्रकांत दत्तात्रय ठाकरे (वय २३, रा. मोहाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहाडी (ता. जळगाव) येथे चंद्रकांत ठाकरे हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. तो ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा विभागात कामाला होता.(young boy death by falling from electricity poll jalgaon news)

गावातील विजेच्या खांबावरील दिवा बंद असल्याने चंद्रकांत तो दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढला होता. दुरुस्ती करताना तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.

येथे चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. चंद्रकांत अविवाहित असून, त्याच्या मागे आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? तुकाराम मुंढेंनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव; किस्सा ऐकून सगळेच हसले

MS Dhoni Pension : सहा वर्षांपूर्वी निवृत्ती, IPL मध्ये अजूनही खेळतोय महेंद्रसिंग धोनी! भारताच्या माजी कर्णधाराला पेन्शन किती?

SCROLL FOR NEXT