fraud
fraud  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : अनाथाश्रमाची संचालिका असल्याचे सांगून उपवधूसाठी तरुणाला ओढले जाळ्यात अन...

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (जि. जळगाव) : उदगिर (जि. लातूर) येथील अनाथाश्रामातील मुली विवाहेच्छूक आहेत,

अशी जाहिरात विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून केली असता त्या अमिषाला बळी पडून उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील उपवर तरुणाची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (young man was lured for bride by saying that she was director of an orphanage looted for 10 thousand jalgaon fraud crime)

विवाह जुळविण्याच्या नावाखाली या संकेतस्थळ चालविणाऱ्या महिला संचालिकेने या तरुणापासून ऑनलाइन सुमारे दहा हजार रूपये घेतले. या तरुणाला ना मुलगी मिळाली, ना घेतलेले पैसे परत मिळाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिस ठाणे गाठून फसवणुकीचा प्रकार पोलिसांच्या कानी घातला. या विवाह जुळवणीच्या अनाथाश्रमाच्या नावाखाली किती तरुणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील ३० वर्षीय तरुण विवाहासाठी स्थळ शोधत असताना स्थळच येत नसल्याने तो निराश होता. अशात त्याची गाठ फेसबुकवर ऑनलाइन चॅटींग करताना विवाहस्थळ जुळविणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका अनाथाश्रमाच्या संकेतस्थळावर भेट झाली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या संकेतस्थळावर एका महिलेशी ऑनलाइन संवाद झाला. महिलेने आपण अनाथाश्रमाची संचालिका असल्याचे सांगत या तरुणाला भूलवून उपवधू मुलगी दाखविण्याबाबत होकार दिला. मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो. त्यासाठी एका दिवसात तीन बैठका होतात. त्यात पहिल्या बैठकीत मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो.

नाश्ता, पाणी दिला जाते. दुसऱ्या बैठकीत वकील व या आश्रमाची संचालिका तसेच मुलगा व मुलगी असे हजर राहतात. त्यावेळी बोलणे होत असते. तिसऱ्या बैठकीत फायनल होते, असे या महिलेकडून सांगण्यात आले. त्यासाठी महिलेने या तरुणाकडून १२ फेब्रुवारी २०२३ ला ऑनलाइन सहा हजार रूपये उकळले.

मुलीच्या कपड्यांसाठी घेतले चार हजार

पैसे देण्याघेण्याचे सोपस्कर पार पडल्यानंतर आता काही दिवसांत लग्न जुळेल, या आनंदात तरूण होता. त्यानंतर तरूणाने या अनाथाश्रमाच्या संचालिकेला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती महिला फोनच घेईना. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने या महिलेला मोबाईलवरून वारंवार मेसेज पाठवले.

फोन करूनही ती महिला फोन उचलेना म्हणून तरूणाने मेसेज केल्यावर त्या महिलेने या तरुणाशी संपर्क साधला. यावेळी त्या महिलेने मुलगी अनाथ आहे. त्यासाठी तिला कपडे-चपला घ्यावे लागतील, असे सांगत आणखी चार हजार रूपये उकळले. या तरुणाने त्या महिलेच्या खात्यात एकूण दहा हजार रूपये भरले.

..अन् तरुणाने घेतली पोलिस ठाण्यात धाव

आता तरी विवाह जुळविण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा या तरुणाला होती. त्याने आठ दिवस वाट पाहिल्यानंतरही त्या महिलेकडून काहीच उत्तर येत नसल्याने या तरुणाने मेसेज पाठवला असता तिकडून उत्तर आले, की आश्रमातील मुलींचा अपघात झाला असून, त्यात त्या जखमी झाल्या आहेत. मागून कारने ठोकून दिले.

आपल्या पायालाही दुखापत झाली आहे, त्यामुळे थोडे दिवस थांबून घ्या, असे त्या महिलेने या तरुणाला सांगितले. मात्र त्यानंतर वांरवार संपर्क साधूनही संबंधितांकडून काहीच उत्तर मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याने या तरुणाने शुक्रवारी (ता. १०) मेहुणबारे पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना आपबिती सांगितली.

पोलिसांनी या तरुणाची तक्रार घेतली आहे. एकीकडे तरुणांचे विवाह जुळून येत नसल्याने समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली असताना दुसरीकडे विवाह जुळवण्याच्या नावाखाली तरुणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे प्रकार घडतच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT