Voter Latest Marathi News
Voter Latest Marathi News esakal
जळगाव

Jalgaon : 17 वर्षांवरील तरुणाई करणार मतदार ओळखपत्रासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : निवडणूक आयोगाने आता युवा वर्गाला वयाच्या १७ व्या वर्षीच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तांत्रिक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. (Youth above 17 years will apply for voter ID card Jalgaon latest marathi news)

वर्षातून तीनदा अर्ज करता येणार

आता युवक वर्षातून तीनदा म्हणजे १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून आगाऊ अर्ज करू शकतात. यासाठी लाभार्थींना १ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.

त्यानंतर प्रत्येक तिमाहीत मतदार यादी अद्ययावत केली जाईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत पात्र तरुणांची मतदार यादीत नोंदणी करता येईल.

मतदार यादी दुरुस्तीतही अर्ज

नोंदणीनंतर युवकांना एक निवडणूक फोटो ओळखपत्र जारी केले जाईल. यावेळी मतदार यादी २०२३ मध्ये दुरुस्ती केली जात आहे.

१ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर २०२३ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेला कोणताही नागरिक, प्रकाशनाच्या शेवटच्या तारखेपूर्वी मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.

आधारक्रमांक जोडणार

आधारनंबर मतदार यादीशी जोडण्याबाबत नोंदणी फॉर्ममध्ये मतदारांसाठी तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या मतदारांसाठी आधार नंबर लिंक करावा यासाठी नवीन फॉर्म ६ ‘ब’ आणला आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कुठल्याही अर्जाला नकार देण्यात येणार नाही.

असा करा ऑनलाइन अर्ज

मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ‘ब’ मध्ये भरून देऊ शकतो. या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जातील. याशिवाय अर्ज क्रमांक ६ ‘ब’ हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.

नमुना अर्ज क्र. ६, ७ व ८ मध्ये १ ऑगस्टपासून सुधारणा करण्यात येत आहेत. नमुना ६ ‘ब’ नव्याने तयार केला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावयाची आहे.

"१७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर युवकांना मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत येणार नाही. ते त्यांचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर येईल. त्यांचे १८ वर्ष पूर्ण होताच मतदार यादीत नाव येऊन त्यांना मतदार ओळखपत्र घरपोच मिळेल."

- तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT