Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : Bitcoinच्या आमीषाने तरुणाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ऑनलाईन करन्सी बीटक्वाईनमध्ये केलेल्या गुंतवणुकीला दोन तासांत डबल करून देण्याचे आमिष दाखवून रिंग रोडवरील तरुणाची ९१ हजार ४०० रुपयांत फसवणूक करण्यात आली.याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील रिंग रोडवर हर्ष घनश्याम अडवाणी (वय २४) हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. वर्क फ्रॉम होम पद्धतीने ऑनलाईन कंपनीत कामाला आहे. (Youth cheated with lure of Bitcoin Jalgaon Crime News)

रविवारी (ता. ४) त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर बीटक्वाईनच्या गुंतवणुकीतून दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष देणारी पोस्ट दिसली. तत्काळ त्याने चॅटींगच्या माध्यमातून संपर्क केल्यावर त्याला सुरवातीला २० हजार गुंतवणूक करण्याचे आमिष देण्यात आले.

२० हजार गुंतवणूक केल्यावर, कंपनीची विविध चार्जेस आणि फीच्या नावे पैसे उकळण्यात आले. तुमचे पैसे डबल झाले आहेत.

मात्र, इंटरनेट प्रॉब्लेममुळे ते खात्यात दिसत नसल्याचे सांगण्यात आले. तब्बल ९१ हजार ४०० रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत हर्ष अडवाणी याने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT