Car blasted by suspects while attacking youth and dead Avinash Ahire
Car blasted by suspects while attacking youth and dead Avinash Ahire  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मित्रांच्या वादातील हल्ल्यात तरुणाचा बळी; सकाळी मुक्ताईनगरात, तर रात्री जळगावात खून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मुक्ताईनगरजवळ रावेरच्या तरुणाचा खून झाल्याची घटना ताजीच असताना, मंगळवारी (ता. ६) रात्री जळगाव शहरातील खोटेनगरजवळ एका तरुणाला धारदार चॉपरने हल्ला चढवून गंभीर जखमी करण्यात आले. उपचार सुरू असताना, तरुणाचा बुधवारी (ता. ७) मृत्यू झाला.

अविनाश निंबा अहिरे (वय ३५, रा. कुसुंबा) असे मृताचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. (youth died in friends dispute jalgaon crime news)

महेश पोपट सोनवणे (वय ४३, रा. चंदूअण्णानगर) आणि त्यांचा मामेभाऊ अविनाश निंबा अहिरे मंगळवारी (ता. ६) महेश सोनवणे यांची रेनॉ कारने (एमएच १९, इए ०४५१) बांभोरी येथील ढाब्यावर जेवणाला गेले होते. तेथे दीपक प्रकाश पाटील हा अविनाश अहिरे यांची दुचाकी घेऊन पोहोचला. तिघांनी जेवण केले.

किरकोळ कारणावरून वाद

तेथेच दीपक पाटील व अविनाश अहिरे यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिघेही खोटेनगर स्टॉपवर पोहोचले. तेथे अविनाशच्या दुचाकीची चावी मागण्यावरून त्याचा व दीपकचा वाद झाला.

दोघांच्या वादात समोरच उभे असलेले दीपकचे मित्र मध्यस्थी करून अविनाशला शिवीगाळ करू लागले. मात्र, आमच्या वादात तुम्ही तोंड खुपसू नका, असे अविनाशने त्या दोघांना खडसावले. याचाच राग आल्याने भांडणाला सुरवात झाली.

चॉपरने कारवरही हल्ला

दीपक व अविनाश यांच्या वादात दीपकचा मित्र साहिल खान व अमोल गवई यांनी अविनाश याच्यावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. याच्यावरच दोघे थांबले नाही, तर त्यांनी अविनाश बसलेल्या महेश सोनवणे यांच्या कारवर त्याच चॉपरने ठोसे मारून समोरील काच फोडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अविनाशचा उपचारादरम्यान मृत्यू

खोटेनगर स्टॉपवर रात्री दहाच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी झाला. महेश सोनवणे याने गंभीर जखमी अविनाशला घेऊन थेट जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

मात्र, सकाळी अविनाश अहिरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसांत रात्री प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी प्रमुख संशयित दीपक प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले.

सावखेड्याच्या शेतातून दोघांना अटक

सकाळी अविनाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, गणेश सायकर, विश्वनाथ गायकवाड, प्रवीण पाटील, तुषार जोशी यांनी मारेकरी साहिल खान व अमोल गवई यांना सावखेडा येथील एका शेतातून अटक केली.

तिघांना पोलिस कोठडी

अविनाश अहिरे याच्या हत्येच्या गुन्ह्यात तालुका पोलिसांनी अटक केलेले दीपक प्रकाश पाटील (मीराबाईनगर), साहिल खान रशीद खान पठाण (वय २२, रा. गुरुदत्तनगर), अमोल रामदास गवई (वय २३, पिंप्राळा) या तिघांना बुधवारी (ता. ७) जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघा संशयितांना सहा दिवस १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT