Death News esakal
जळगाव

Jalgaon News : खेडीत छतावरून पडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खेडी खुर्द (ता. जळगाव) येथील तरुणाचा छतावरून (Roof) खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १) सकाळी सातला उघडकीस आली. अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. (youth fell from roof and died on spot jalgaon news)

खेडी खुर्द येथील अंकुश चौधरी मंगळवारी (ता. २८) रात्री जेवण करून घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेला. बुधवारी (ता. १) सकाळी सातला त्याची आजी गोपाबाई चौधरी त्याला उठविण्यासाठी गेल्या असता, अंकुश छतावरून खाली पडल्याने मृतावस्थेत दिसून आला.

नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड केली. कुटुंबीयांनी आक्रोश केला. नेमका छतावरून अंकुश कसा पडला, हे कुणालाच समजले नाही. याबाबत जळगाव तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत अंकुशच्या पश्चात आई सुनीता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर चौधरी, आजी गोपाबाई असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड तपास करीत आहे.

जिना समजुन खाली टाकला पाय

अंकुश चौधरी हा गच्चीवर एकटाच झोपत होता. गच्चीला पॅरापेट वॉल नसल्याने जिना समजुन अंकूशचा पाय पडला आणि तो खाली केासळला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून तालूका पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला असुन धार्मीक विधी अटोपल्यार कुटूंबीयाची विचारपुस हेाणार आहे अशी माहिती तालूका पेालिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT