Pankaj Mahale during a unique protest at Shivaji Maharaj Chowk.
Pankaj Mahale during a unique protest at Shivaji Maharaj Chowk.  esakal
जळगाव

Jalgaon News : बागायतदार आहे.. बागायदारीण पाहिजे! बागायतदाराचे अनोखे आंदोलन...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अलीकडच्या काळात नोकरी नसेल तर छोकरी मिळत नाही, असे चित्र आहे. सधन शेतकरी असला तरी त्यास कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही.

त्यामुळे अनेक सधन शेतकऱ्यांची मुले, शेती काम करणारे तरुण लग्नाविना असल्याचे व त्यातून कौटुंबिक मनस्ताप व कलह वाढीस लागत असल्याचे आपण पाहतो, अथवा ऐकतो. (youth unique protest for marriage in jalgaon news)

विवाहासाठी मुलाची निवड करताना त्यास नोकरी असावी, तो एकटाच असावा, आई, वडील व कुटुंबीयांपासून दूर नोकरीस असावा यासोबतच त्यास शेती असावी, अशा अपेक्षा असतात. जर शेतकरी मुलगा लग्नासाठी चालत नाही तर मग मुलाकडे शेती असावी, अशी अपेक्षा का ठेवली जाते? हा यक्षप्रश्न असल्याचा सुरही व्यक्त होतो.

परंतु समाज मनात वाढीस लागत असलेल्या या मनोवृत्तीमुळे सधन शेतकरी अथवा बागायतदारांची मुले व स्वतः शेतीची कामे करणाऱ्या उपवर तरुणांचे विवाह होत नाहीत.

या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील उपवर बागायतदाराने नवरदेवाचा पेहराव करत, कपाळावर मुंडावळ्या (बाशिंग) बांधून पाचोरा येथे केलेले अनोखे आंदोलन शहरवासीयांचे लक्ष वेधणारे ठरले आहे. या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाचणखेडा येथील पंकज राजेंद्र महाले हा उपवर बागायतदार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या बांधत आला व त्याने 'बागायतदार आहे बागायतदारीण हवी' असा फलक हातात घेऊन उंचावत अनोखे आंदोलन केले.

हा बागायतदार तरुण १० एकर बागायती शेतीचा मालक व पदवीधर असला तरी तो खेडेगावात वास्तव्यास आहे व त्याला नोकरी नाही म्हणून लग्नासाठी कोणी मुलगी मिळत नसल्याने त्याने अनोखे व लक्षवेधी आंदोलन केले.

आंदोलनाने सारेच विचारमग्न..

नवरदेवाच्या पेहरावत हातात फलक उंचावत बागायतदार तरुणाने केलेले हे अनोखे आंदोलन पाहून शहरवासीय प्रथम अचंबित झाले, परंतु या उपवर बागायतदाराच्या आंदोलनामागची भूमिका कळाल्यानंतर मात्र उपस्थित सारे भाऊकही झाले.

समाजात असलेले वास्तव या बागायतदार तरूणाने आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच साऱ्यांनाच विचारमग्न करणारा ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT