Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सुप्रीम कॉलनीत पूर्व वैमानस्यातून घमासान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रीम कॉलनीत पूर्ववैमानस्यातून शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. पुन्हा रात्री दोनला संशयितांनी वाहन पेटवून दिले. (youth was stabbed to death in Supreme Colony jalgaon crime news)

पोलिस दखल घेत नाहीत, म्हणून संशयितांनी जखमीच्या लहान भावावर रविवारी (ता. ९) दुपारी सुऱ्याने हल्ला करून जखमी केले. सुप्रीम कॉलनीत गेल्या दोन दिवसांपासून हाणामारी सुरू आहे. शुक्रवारी रात्री आठला तारीख पटेल, इम्रान खाटीक व रेहान खाटीक यांचा वाद सुरू होता.

त्यावेळी आसिफ खान यासीन खान (वय २५, रा. सुप्रीम कॉलनी) याने काय झाले, असे विचारले. त्याचा राग आल्याने इम्रान अजीज खाटीक, रेहान इम्रान खाटीक, रईस गुलाब पटेल आणि जुनेद गुलाब पटेल (सर्व रा. सुप्रीम कॉलनी) यांनी आसिफ खानला बेदम मारहाण केली, तसेच चाकूने त्याच्या हातावर वार करून जखमी केले. याबाबत जखमी आसिफ खान याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

घर पेटविण्याचा प्रयत्न

पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने रात्री दोनला संशयितांनी आसिफ खान याच्या घराबाहेर उभी असलेली दुचाकी (एमएच १९, डीएस ७९६९) पेट्रोल ओतून पेटवून दिली. तसेच, घराच्या दारावरही पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे जखमींचे म्हणणे आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शनिवारी (ता. ८) रात्री नऊला आसिफ खान याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पुन्हा तक्रार दिली. त्यावरून संशयित इम्रान खाटीक, रेहान खाटीक, रईस पटेल आणि जुनेद पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील तपास करीत आहे.

रविवारी पुन्हा चॉपर हल्ला

रविवारी (ता. ९) दुपारी तीनच्या सुमारास जखमी आसिफचा भाऊ मोईन खान यासिन खान (वय २१) मशिदीतून नमाज अदा करून घराकडे येत असताना, इम्रान खाटीक याने त्यास शिवीगाळ केली. इम्रान खाटीक व रेहान खाटीक यांनी मारहाण केली. संशयितांनी सुऱ्याने मोईन याच्यावर चार वार करून गंभीर जखमी केले. त्याच्यावर जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इम्रान पोलिसांचा खबरी

इम्रान खाटीक एमआयडीसी पोलिसांचा खबरी असून, पोलिसच त्याला वाचवीत असल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT