Yuvarang 2023
Yuvarang 2023 esakal
जळगाव

Yuvarang 2023 : लोकनृत्यातून घडले संस्कृतीचे दर्शन; पारंपरिक वाद्याच्या तालावर थिरकली तरुणाईची पावले

समीर तडवी

फैजपूर (जि. जळगाव) : युवारंग युवक महोत्सवाच्या रविवारी (ता. १२) अखेरच्या दिवशी पाचही रंगमंचांवर विविध स्पर्धांची धमाल पाहायला मिळाली. विशेष करून लोकनृत्य कलाविष्काराने धमाल केली.

नृत्याने अक्षरशः प्रेक्षकांचे पाय थिरकले. दिवसभर आनंददायी वातावरणाने महाविद्यालय परिसर न्हाऊन निघाला होता. (Yuvarang 2023 vision of culture through folk dance steps of youth swayed to rhythm of traditional instruments)

रंगमंच एकवर सकाळपासून भारतीय लोकसमूह नृत्य सादर करण्यात आले. सर्वप्रथम ‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या गीताने सुरवात झाली. पारंपरिक वेशभूषा साकारून नृत्याचा एकाहून एक नृत्याचा आविष्कार सरस ठरत होता.

विशेषतः: आदिवासी चालीरीती किंवा‘संस्कृतीचे नृत्य सादर करण्यात आली. त्यात पारंपरिक आदिवासी वेशभूषा व पारंपरिक वाद्यांचे फ्यूजन पाहायला मिळाले. एकप्रकारे या नृत्यांच्या माध्यमातून चालीरीती किंवा‘संस्कृतीचा एकप्रकारे संदेश देण्यात आल्याचे दिसून आले.

एकूण २४ संघ सहभागी झाले होते. यात चार आदिवासी नृत्य सादर करण्यात आली. दुसऱ्या क्रमांकावर खानदेशातील भिल्ल पावरी विवाह व विधी आदिवासी नृत्यातून सादर केले. या नृत्यासाठी पारंपरिक ढोल-ताशांचा वापर करण्यात आला.

त्याचप्रमाणे ‘आम्ही असल ढांगी आदिवासी आम्ही झाडी जंगलना रहिवासी’, हे नृत्य केले. ‘अंबाबाई’च वार भरलं अंगात..’ या गीतावरील नृत्याने सर्वांच्या अंगात वार भरून टाकलं. या नृत्याला भरभरून साद मिळाली.

या रंगमंचावर २४ संघांनी आपल्या नृत्य कलाविष्काराची प्रतिष्ठा पणाला लावली. धनगर नृत्य, भिलावू नृत्य, ढोलू कुथिया (कर्नाटक) नृत्य, त्रिपुरा लोकनृत्य, बंजारा नृत्य, वाघ्या-मुरळी नृत्य, हरियाना नृत्य, डांगी नृत्य अशा नृत्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या कलाविष्काराला श्रोत्यांची देऊन भरभरून साद देऊन कलावंतांचा अधिक उत्साह वाढवला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

रंगमंच एकवर वारकऱ्यांची दिंडी, आदिवासी नृत्य, पारंपरिक नृत्य, पावरी नृत्य, ढोल-ताशांच्या तालावर थिरकणाऱ्या स्पर्धकांनी उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट करण्यास भाग पाडले. ‘अग सुटला माझा पदर बाई मी नव्हती भानात’, अन् ‘अंबाबाईच वारं माझ्या भरल्या अंगात’ या समूह नृत्याने सारी तरुणाई जल्लोष करीत राहिली.

साऱ्या रंगमंचावर हळदीचं उधळण होत. शिस्तबद्ध पद्धतीने समूहनृत्य करीत सर्व प्रेक्षकांचे मन जिंकली. भलरी, पावरीनृत्य, आदिवासी डोंगरातील गीत, बंजारा नृत्य, कोळी नृत्य, ग्रामीण आदिवासी, खंडेरायाच्या लग्नाला, बंजारा लंबाडिया, होळी सण आदी नृत्याचे प्रकार ढोल, नगारा, घुंगरू या वाद्यांच्या सहाय्याने थिरकत स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

विविध पारंपरिक पोशाखातून संस्कृतीचे दर्शन घडताना दिसत होते. समूहनृत्य प्रकार हा सर्वाधिक गर्दी खेचणारा रंगमंच ठरला. शिट्टयांच्या गजरात वन्समोअरची मागणी प्रेक्षकांमधून होत होती. आदिवासी नृत्य करणाऱ्या महिला स्पर्धकांनी आकर्षक पेहराव व त्यावर परिधान केलेली दागिने, हे विशेष आकर्षण ठरले.

टाळ-मृदंग, झांजच्या साहाय्याने वारकरी संप्रदायातील नृत्याने परिसर भक्तिमय झालेला दिसून येत होता. प्रत्येक सहभागी स्पर्धक आपली कला जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे सादर करण्यासाठी प्रयत्नशील होता.

निनादाने गुंजला युवारंग परिसर

‘युवारंग गीत’ तरुणाईला खानदेशचा महिमा व तरुणाईचा उत्साह सांगून जातो. या ओळी सहज ओठावरती येतात. मुलूख आमचा खानदेश’ हा मनामनाला जोडतो. खानदेशाच्या मातीचा झेंडा उंच फडकतो.

या ओळींसोबतच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरतो पिकावर’ या ओळी युवा रंगाला एका वेगळ्या उंचीवर नेतात. खर तर खानदेशी भूमी ही जशी साहित्याची तशीच सौजन्याची ही आहे आणि यातून नसानसातून स्वाभिमान कलावंत घडविला जाण्याचा संदेश युवराज गीताच्या माध्यमातून दिला गेला आहे.

ठेका धरून अंगी असलेल्या कलागुणांना उच्चतम व्यासपीठ मिळवण्यासाठी सज्ज झालेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT