Raju-Bhaskar
Raju-Bhaskar 
काही सुखद

Success Story : शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा झाला पीएसआय

सकाळवृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यातील तरुणाच्या जिद्दीचे यश; नोकरी सांभाळून १८ तास अभ्यास
पिंपरी - जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जातात. मात्र, लहान भाऊ राजू यांची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांनी सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी १८ तास अभ्यास केला. त्यात ते यशस्वी झाले. राज्यात १०२ क्रमांक मिळविला. संघर्षमयी प्रवास पाहिलेल्या कुसुंबे गावाने राजू यांचे जल्लोषात स्वागत केले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजू भास्कर यांनी लहानपणापासून गरिबीचे चटके सहन केले. अद्यापही गावाकडे दहा बाय दहाच्या पत्र्याच्या घरकुलात मिळालेल्या खोलीत ते राहतात. मोठ्या जिकिरीने अभ्यासाला सुरुवात केली. त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून कुटुंबाने मजुरी व शेळीपालन करून त्यांना शिकवले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. ते तेथील शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. उच्च माध्यमिक व महाविद्यालयात इंग्रजी विषयात ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अपयश हे त्यांच्या आयुष्यात जणू लिहिलेच नव्हते. परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांनी पोलिस दलात नोकरी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पोलिस हवालदार म्हणून पुणे पोलिस दलात निवड झाली व त्यांनी प्रशिक्षण काळात प्रथम क्रमांकसुद्धा मिळविला. परंतु, लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने ते तिथेच न थांबता अधिकारी पदावर कसे जाता येईल, यासाठी त्यांनी सतत कष्ट केले.

पोलिस खात्यातील नोकरी सांभाळून एमपीएसीसाठी कठोर परिश्रम घेतले. २०१६ला घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत अवघ्या दोन मार्कानी पोस्ट गेली. आयुष्यात ते पहिल्यांदा अयशस्वी झाल्यामुळे त्यांना हे दुःख कायम मनात बोचत होते.पण ते तिथेच थांबले नाही. सुदैवाने २०१७ मध्ये लगेच एमपीएससीची जाहिरात निघाली. त्यांनी ठाम निश्चय करून या परीक्षेत यश मिळविले. अभ्यासासाठी स्वत:ला कोंडून घेत स्वतंत्र खोली घेतली. या परीक्षेत ३२२ पदांमध्ये राज्यात १०२ रँक मिळवत त्यांनी घवघवीत यश मिळविले. राजू यांचे कष्ट पाहून आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व इतर नातेवाइकांना आनंदाश्रू अनावर झाले. गावातील पहिला पीएसआय म्हणून गावाने त्यांचा जाहीर सत्कार केला. चिंचवड पोलिस ठाणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातर्फेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

साडेपाच वर्षे पोलिस हवालदार म्हणून काम केल्यानंतर आता त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेऊन अधिकारी म्हणून रुजू होणे मोठे भाग्य आहे. पेट्रोलिंगला गेलो, तरी वेळ मिळेल तसा अभ्यास करत होतो. हवालदार असताना खूप ओढाताण झाली. बॅंकेचा हप्ता आणि पैसे गावाला पाठवावे लागतात, त्यामुळे गरिबीची झळ बसत होती. सध्या चिंचवड पोलिस ठाण्यात सायबरमध्ये काम करत आहे.
- राजू भास्कर, पोलिस उपनिरीक्षक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT