Gautami River esakal
कोकण

Gautami River : 'गौतमी’तून काढला 1400 ब्रास गाळ; उपशाने नदीपात्र रुंदावले

गेले किती वर्ष गाळमुक्त होण्यासाठी गौतमी नदी (Gautami River) प्रतीक्षेत होती.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दहा दिवसांच्या कालखंडामध्ये सुमारे ६०० ते ६५० डंपरच्या माध्यमातून १३०० ब्रास गाळ नदीपात्राबाहेर पाठवण्यात आला आहे.

पावस : गेले किती वर्ष गाळमुक्त होण्यासाठी गौतमी नदी (Gautami River) प्रतीक्षेत होती. अखेर शासन व नाम फाउंडेशन आणि पावस ग्रामपंचायत (Pawas Gram Panchayat) यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गेल्या दहा दिवसांमध्ये जवळपास ६०० ते साडेसातशे डंपरच्या माध्यमातून सुमारे १४०० ब्रास गाळ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे नदीपात्रामध्ये खोलगटपणा निर्माण झाला व पाण्याचे स्रोत वाढले.

चार वर्षांपूर्वी गणपती मंदिर ते बळगे स्मशानभूमीदरम्यान गौतमी नदीचा गाळ उपसण्यात आला होता. त्यामुळे नदीचे पात्र खोलगट झाले होते. पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी सरळ रेषेत वाहत होते. पोकलेन मशिनच्या साह्याने गाळ उपसण्याचे काम सुरू असून, नाम फाउंडेशनचे दोन डंपर व खासगी पाच डंपर अशा सात डंपरच्या माध्यमातून दररोज ३० ते ४० डंपरच्या माध्यमातून गाळ उपसला जात असून, तो अनेक खासगी क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार टाकला जात आहे. त्यासाठी अनेकजणांची या उपक्रमाला चांगली मदत होत आहे. त्यामुळे गाळ नदीपात्राबाहेर पाठवला जात आहे.

गेल्या दहा दिवसांच्या कालखंडामध्ये सुमारे ६०० ते ६५० डंपरच्या माध्यमातून १३०० ब्रास गाळ नदीपात्राबाहेर पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्राची उंची पाच ते सहा फूट झाली आहे. गाळ काढल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे स्रोत वाढणार आहे. पंचायतीच्या माध्यमातून ज्यांना गाळाची आवश्यकता आहे, अशांना गाळ नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात उपसरपंच प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर चिरेखाण संघटनेला गाळ वाहून नेण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे; परंतु त्यांना गाळ वाहून आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ज्यांना आवश्यकता असेल तर त्यांनी गाळ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

LPG Supply Crisis India : एलपीजीबाबत मोठी अपडेट समोर ! नवीन कनेक्शन्स मिळणार की नाही? सरकारने नेमकं काय सांगितलं...

Jal Jeevan Mission: कोट्यवधींचा जलजीवन मिशन फेल; टाकळी-परिसरात पाणी असूनही ग्रामस्थ तहानलेले

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

SCROLL FOR NEXT