Vaccination  sakal
कोकण

४० हजार विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन; १५ ते १८ वयोगटाचा समावेश

सिंधुदुर्गात नियोजन

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य (Zilla Parishad Health) विभागामार्फत जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ४० हजार विद्यार्थ्यांना आजपासून कोरोना प्रतिबंधक (covacin) लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे (Dr. Mahesh Khalipe) यांनी आज दिली.

केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार आजपासून १५ ते १८ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी (Vaccination) कोव्ह्यक्सिन लसचा वापर केला जाणार आहे. ज्यांचा जन्म २००७ पूर्वी झाला आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली लस उपलब्ध आहे.

जिल्ह्यात ४० हजार लस उपलब्ध आहे. या लासिकरणासाठी शिक्षण व आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. शिक्षण विभागाने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे तसेच इंटरनेट सुविधा, डाटा ऑपरेटर आणि कक्ष उपलब्ध करून द्यावा तर आरोग्य विभागाकडून लस, लसीकरणसाठी लागणारे साहित्य व मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सुमारे ४० हजार विद्यार्थी आहेत. लसिकरणात कोणताही व्यत्यय न आल्यास १५ दिवसात सर्व १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण केले जाईल. आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात आठ ठिकाणी लसीकरण सुरु आहे. उद्यापासून (ता.४) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये लसीकरण होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा व कोविड आजारापासून संरक्षित व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT