8 Tortoise dead dabhol see campaign of Ratnagiri district kokan marathi news 
कोकण

रत्नागिरीत 'यामुळे' 8 नवजात कासवांच्या पिल्ल्यांना गमवावा लागला आपला जीव.....

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी ) :  दाभोळ येथील कासव संवर्धन केंद्रातून नैसर्गिक पद्धतीने कासवांची पिल्ले बाहेर येण्याची प्रक्रिया घडली नाही त्यामुळे येथील 8 कासवांच्या पिल्लांचा मृत्यु झाला. केंद्रातील 62 पिल्ले समुद्रात सुखरूप सोडण्यात आली. वन कर्मचारी वेळेवर न पोहचल्यामुळे  निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावर कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. दाभोळ कासव संवर्धन केंद्रातील या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. 

सात ठिकाणी वनरक्षक
निसर्ग मित्र संस्था चिपळूण आणि महाराष्ट्र शासन वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील समुद्र किनार्‍यावरील ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी कासव संवर्धन केंद्रात संवर्धित केली जात आहेत. दापोलीतील समुद्र किनार्‍यावर सात ठिकाणी ही मोहीम सुरू आहे. याबाबत माहिती देताना दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे म्हणाले, अंडी घालण्यासाठी कासव रात्री बाहेर पडतात. कासवांची अंडी कुत्री खातात. कुत्र्यांपासून ती वाचवण्यासाठी सात ठिकाणी वनरक्षक आणि त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नेमलेले आहेत. वन कर्मचारी आणि स्वयंसेवक रात्री समुद्र किनार्‍यावर गस्त घालतात.

कासवांची जन्मप्रक्रिया

कासवांनी घातलेली अंडी गोळा करून ती कासव संवर्धन केंद्रात आणून ठेवतात. तेथे नैसर्गिक पद्धतीने कासवांची पिल्ले तयार होतात. 45 ते 60 दिवसामध्ये कधीही पिल्ले बाहेर येवू शकतात. 45 दिवसानंतर आमचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात. 50 दिवसानंतर पिल्ले बाहेर येण्याच्या ठिकाणी टोपली ठेवतात. ज्या ठिकाणाहून पिल्ले बाहेर येतात तेथे खड्डा पडतो ही पिल्ले बाहेर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. 9 मार्चला दाभोळ येथील ज्या संवर्धन केंद्रात हा प्रकार घडला आहे. तेथे आमचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. घरट्यांची पाहणी केली तेव्हा नैसर्गिक प्रक्रिया झालेली नव्हती. मात्र ज्यावेळी पिल्ले बाहेर पडली तेव्हा केंद्रात कोणी नव्हते. त्यामुळे हा प्रकार घडला. 10 मार्चला 62 कासवांची पिल्ले आम्ही सुखरूपपणे समुद्रात सोडली आहे. ..

वन विभागाने काळजी घेणे गरजेचे

हा विषय अपघातानेच झाला असला तरी नैसर्गिक प्रक्रिया समजली नाही हे सांगणे चुकीचे आहे. तेथे ज्या कर्मचार्‍याची नेमणूक केलेली आहे त्याची जबाबदारी आहे. 50 दिवसानंतर वारंवार कासव संवर्धन केंद्राची पाहणी करून पिल्ले बाहेर आली की नाही हे पाहणे गरजेचे असते. यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी वन विभागाने घेणे गरजेचे आहे.

भाऊ काटदरे, कार्यध्यक्ष निसर्ग मित्र संस्था चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

IPS Mohita Sharma: कोण आहेत आयपीएस मोहिता शर्मा? KBCमध्ये १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून, पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT