accident case in savantwadi kokan marathi news 
कोकण

मुंबईच्या 'या चिमुकलीचा' शिमगोत्सव ठरला अखेरचाच....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  दुचाकी घसरून तीन वर्षीय बालिका एसटी बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने चिरडून मृत्यू पावली. 
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोनुर्ली-देऊळवाडी येथे घडली. उर्वी रोहन पुळासकर (वय ३, रा. मळगाव मधलीवाडी सध्या मुंबई) असे तिचे नाव आहे. उर्वी ही १५ दिवसांपूर्वीच शिमगोत्सवानिमित्त आजोळी आली होती.

येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उर्वी ही आजी-आजोबा समवेत मुंबई येथून शिमगोत्सवासाठी मळगाव येथे आजोळी पंधरा दिवसांपूर्वी आली होती. आज सायंकाळी मळगाळ-सोनुर्ली गावातील शिमगोत्सव कार्यक्रम असल्याने ती आजी व आजोबांसोबत दुचाकीवरून कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होती. 

गाडीवरील ताबा सुटला अन्

यावेळी सोनुर्ली-देऊळवाडी येथील एका वळणावर त्यांची दुचाकी आली. आजोबा सीताराम नारायण पुळासकर हे दुचाकी चालवत होते. दुचाकीवर मध्ये उर्वी तर मागे आजी बसली होती. रस्त्याच्या साईडपट्टीवर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व दुचाकी घसरली व यामुळे गाडीवर बसलेली नात उर्वी ही रस्त्यावर उजव्या बाजूने फेकली गेली. त्याचवेळी सोनुर्ली येथून पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने परतत असलेल्या सोनुर्ली-सावंतवाडी या एसटी बसच्या मागच्या चाकाखाली ती सापडली. यातच तिचा मृत्यू झाला. हा अपघात होताच रस्त्यावर चे दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते. मृत नातीला आजी-आजोबांनी उचलून घेत तातडीने उपचारासाठी मदतीचा धावाधाव केला; मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

मळगाव ग्रामस्थांनी  शिमगोत्सव केला उत्सव रद्द 
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनास्थळी आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे यांनी धाव घेतली. या घटनेनंतर मळगाव ग्रामस्थांनी तातडीने शिमगोत्सवातील आजचा उत्सव रद्द करत घटनास्थळी धाव घेतली. विच्छेदनसाठी बालिकेचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. घटना समजताच रुग्णालयाच्या आवारात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यातील मुलीचे आई, वडील, सर्व कुटुंब कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक आहेत. धार्मिक कार्यक्रमानिमित्त दरवर्षी ते सर्व सणांना मळगाव मूळ गावी येतात. याही वर्षी शिमगोत्सवसाठी ते आले असता ही घटना घडली. या घटनेबाबत मुलीच्या आजोबांनी वडील रोहन पुळासकर यांना कल्पना दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात कल्पना दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हेही वाचा -  खेड मध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ.... ​
मन पिळवटून टाकणारा आक्रोश

रोहन पुळासकर यांचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांची उर्वी ही पहिलीच मुलगी होती. अपघातानंतर आजीने उर्वीचा मृतदेह हृदयाशी लावून एकच आक्रोश घटनास्थळी केला. आजीने केलेला हा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. ही घटना समजताच मुलीचे आई, वडील मुंबई येथून तातडीने मूळगावी मळगाव येथे येण्यास रवाना झाले.

अरुंद रस्त्यांनी घेतला बळी
गावातील अरुंद रस्ते, तसेच रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टी नसल्यामुळे ही अपघाताची घटना घडली. ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे असे जीवावर बेतणारे अपघाताच्या प्रसंगांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT