accident near aamberi ghat on mumbai goa highway 
कोकण

ब्रेकिंग - आंबेरी येथील वळणावर दोन कारच्या धडकेत १५ जण जखमी तर ४ गंभीर...

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर (रत्नागिरी) - मुंबई - गोवा महामार्गावर आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आरावलीपासून २ कि मी अंतरावर शिंदें आंबेरी येथे एका वळणावर झालेल्या इनोव्हा आणि इर्टिका कार मध्ये अपघातात सुरेखा दशरथ चव्हाण ही इर्टिकामधील महिला ठार झाली.  ४ जण गंभीर जखमी झाले तर ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इर्टिगामधील प्रवासी मुंबईहून लांजा वेरवली येथे शिमगोत्सवासाठी चालले होते.

मुंबई गोवा महामार्गावर समोरासमोर धडक

अपघातामधील इर्टिगा कार क्रमांक एम.एच.०५ डीएच ४१८६ ही कार मुंबई ते लांजा वेरवली येथे शिमगोत्सव पालखीसाठी चालले होते तर इनोव्हा कार क्रमांक एमएच ०९ डीए ०१८१ ही रत्नागिरीहुन कामथे चिपळूणकडे चालली होती. आज दुपारी ही दोन्ही वाहने शिंदेंआंबेरी ता.संगमेश्वर येथे आली असता मुंबई गोवा महा मार्गावर समोरासमोर धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला. इर्टिका कार विनायक दशरथ चव्हाण हे चालवीत होते तर इनोव्हा कार नदीम आदम दरवाजकर रा. कामथे हे चालवीत होते.

काहींची प्रकृती चिंताजनक
      
इर्टिगा  कार मधील विनायक दशरथ चव्हाण, वैष्णवी दशरथ चव्हाण, आशिष दशरथ चव्हाण, उन्नती दशरथ चव्हाण, दिविष आशिष चव्हाण, पुष्पलता मनोहर सक्रे, मनोहर तुकाराम सेक्रे आणि अर्चिता आशिष चव्हाण हे जखमी झाले आहेत. यापैकी वैष्णवी चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. या सर्वांना उपचारासाठी संगमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात  इनोव्हामधील संतोष बाळ दाभोळकर यांचा हात तुटला आहे. तर नीता संतोष दाभोळकर  व  किलजे (पूर्ण नाव माहिती नाही)  यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही कारच्या इंजिनच्या भाग चक्काचूर झाला. 

अपघातस्थळी धाव
       
अपघात झाल्याचे कळताच देवरुख पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप सावंत, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिंदेंआंबेरीचे पोलिस पाटील मारुती शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, मंगेश परकर आदींनी अपघातस्थळी धाव घेऊन दोन्ही कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघाताचे वृत्त कळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, माखजनचे पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, ए. व्ही. मोहिते, संदीप मानके, उशांत देशमवाड, संतोष झापडेकर आदी पोलिस घटनास्थळी पोहचले व जखमींना दवाखान्यात पाठविले. अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT