Accidental soldier dies in Madhya Pradesh kokan marathi news
Accidental soldier dies in Madhya Pradesh kokan marathi news  
कोकण

मध्यप्रदेशातील अपघातात चिपळूणातील 'या जवानाला' गमवावे लागले प्राण....

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : पिंपरी खुर्द (ता. चिपळूण) येथील विशाल रघुनाथ कडव यांचे रविवारी सायंकाळी मध्यप्रदेशमधील सागर शहरात अपघाती निधन झाले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर पिंपरी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा- फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा... 

विशाल आणि त्याचा साथीदार श्रीकांत दोघे मध्यप्रदेशातील ढाणा येथे दुचाकीने गेले होते. परत येत असताना त्यांच्या दुकाचीला डंबर चालकाने उडविले. दोघांच्या डोक्यात हेल्मेट होता. मात्र डंपरची दुचाकीला जोरात धडक बसली. त्यात हे दोघे लांब फेकले गेले. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. दोघांना मकरोनिया या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारा दरम्यान विशालचे निधन झाले. 

13 वर्षे केली देशाची सेवा. 
विशाल त्यांच्या मृत्यूची बातमी रात्री खेर्डी येथील त्यांच्या मित्राला कळविण्यात आली. त्यांचे वडील रघुनाथ कडव हे माजी सैनिक असून ते आजारी असल्याने महिनाभरापूर्वीच विशाल आपल्या वडिलांना भेटून गेले होते. पत्नी आणि आणि चार वर्षाचा मुलगा शिव यांच्यासह ते आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी राहत होते.विशालचे बारावीपर्यंत शिक्षण हे चिंचघरी येथील हायस्कूलमध्ये झाल्यानंतर ते 15 मराठा बटालियनमध्ये दाखल झाले. गेली 13 वर्षे ते देशसेवेत होते. 9 वर्षं जम्मू काश्मीरमध्ये काढल्यानंतर आता ते भोपाळमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्यात आई, वडील, तीन बहिणीसह पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT