Administration focuses on preventing workers kokan marathi news 
कोकण

रत्नागिरीत कामगारांची आबाळ रोखण्यावर प्रशासनाचे लक्ष..

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : प्रशासनाने नियमित रोजगारावर असलेल्या कामगारांना जेवण पोचवण्यास सुरुवात केली आहे. तर  जिल्ह्यात विविध रुग्णालयात विलगीकरणासाठी ठेवलेल्या रुग्णांची संख्या 36 वर पोचली आहे. 

संशयित रुग्णांची संख्या आता 15 वर
जिल्ह्यात रविवारी संशयित रुग्णांची संख्या 15 ने वाढली आहे. त्यात कळंबणी 7, संगमेश्‍वर 1, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय 7 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 19 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 57 जणांना उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात 36 रुग्णांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. जिल्हयात जेएसडब्लू, जयगड पोर्ट तसेच येथील औद्योगिक वसाहतीत असणार्‍या कंपन्यांनी त्यांच्याकडील रोजंदारीवर असणार्‍या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.

सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह

इतर तालुक्यातील रोजंदारीवरील कामगारांची संख्या 474 इतकी असून त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनने केली आहे.  तसेच तशी व्यवस्था नसलेल्या 21 पैकी  खेड येथे निवारा केंद्रात 12 व दापोली येथे 9 जणांण ठेवण्यात आले आहे. त्यांना जेवण पोच झाले आहे.दरम्यान तपासणीसाठी नमुने पाठविलेल्या पैकी सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 त्या चौघी प्रेस च्या नावाखाली रत्नागिरी 

रत्नागिरीच्या रहीवाशी असलेल्या पाचजणी मुंबईत नोकरीसाठी राहत होत्या. कोरोनामुळे त्यांना नोकरी किंवा कामच नसल्यामुळे त्यांना परतीचे वेध लागले होते. बंदी असल्यामुळे त्यांनी चारचाकी गाडीवर प्रेस लिहून रत्नागिरीकडे येण्यास निघाल्या. रत्नागिरीत शहरात प्रवेश करण्यापुर्वी हातखंबा येथे त्यांची चौकशी झाली. त्यात त्यांचा बनाव उघडकीस आला. सतर्क असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे आयकार्ड मागितले. मात्र ते देऊ शकले नाहीत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT