OBC Reservation esakal
कोकण

OBC Reservation : 'मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ओबीसी आरक्षणासाठी कुणबी समाज करणार आंदोलन'

खेड तालुक्यातील सर्व कुणबी समाज हा आपल्या मातृसंघटनेच्या पाठीशी आहे.

सकाळ डिजिटल टीम

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचावासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाज आंदोलन करणार आहेत.

खेड : कुणबी समाजाच्या (Kunbi Community) समस्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असून, जातनिहाय जनगणना व ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचावासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाज आंदोलन करणार आहेत, अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष भूषण बरे यांनी दिली.

नवभारत हायस्कूल सभागृहात कुणबी समाजाच्या सभेत ते बोलत होते. या वेळी कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम, समाजनेते सुरेश भायजे, नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, शाखा खेड तालुका मुंबईचे अध्यक्ष शंकर बाईत, कृष्णा आगरे, दीपक शिगवण, सचिन गोवळकर, ॲड. डफळे, समाजोन्नती संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Kunbi Community OBC Reservation

मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृह इमारती लोकार्पण सोहळासंदर्भात चर्चा करण्यात आली. ओबीसी जातीनिहाय जनगणना व ओबीसी सामाजिक व राजकीय आरक्षण बचाव करणे, तिल्लोरी कुणबी समाजाची माहिती जमा करून मागासवर्ग आयोगाला सादर करण्याविषयी नियोजन व खेड तालुक्यातील कुणबी सांस्कृतिक भवनासाठी शासकीय जागा या विषयांवर चर्चा झाली.

खेड तालुक्यातील सर्व कुणबी समाज हा आपल्या मातृसंघटनेच्या पाठीशी आहे. ज्या ज्या वेळी संघाध्यक्ष कुणबी समाजाला जातनिहाय जनगणना, ओबीसीच्या आरक्षणासाठी व कुणबी समाजाच्या प्रश्नांवर एकत्र येण्यास सांगेल त्या वेळी सगळा समाज आपल्यासोबत असेल, असे आश्वासन शंकर बाईत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT