Akansha Kadam Won State Ranking Carrom Competition Ratnagiri News 
कोकण

वयाच्या चाैदाव्यावर्षी आकांक्षाने जिंकली राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - सावंतवाडी येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने सर्वांत लहान वयात म्हणजे 14 व्या वर्षी महिला एकरीचे विजेतेपद पटकावत विक्रम केला. मुंबईतील राष्ट्रीय खेळाडू नीलम घोडके हिचा आकांक्षाने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. 

पहिला सेट नीलमने जिंकला पण...

(कै.) नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित व सिंधुदुर्ग, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने गेले तीन दिवस स्पर्धा सुरू आहे. अंतिम सामन्यात पहिला सेट नीलमने 12-15 असा जिंकला. परंतु आकांक्षाने चिकाटीने दुसरा सेट 25-21 असा जिंकला आणि जेतेपदासाठी जोरदार लढत दिली. तिसऱ्या सेटमध्ये आकांक्षाने आक्रमक खेळ करत 23-13 असा लिलया जिंकत विजेतेपद पटकावले.

उपांत्यपूर्व फेरीत आकांक्षाची आयेशावर मात

उपांत्यपूर्व फेरीत आकांक्षाने माजी राष्ट्रीय विजेती आयेशा खोकावाला हिच्यावर 17-11, 19-25 व 22-11 अशी मात केली. उपांत्य फेरीत पुण्याच्या पुष्करणी भट्टड हिच्यावर 6-19, 25-16 आणि 17-16 अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आकांक्षाने नीलमला कडवी झुंज देत विजय मिळवला. स्पर्धेत रत्नागिरीची मनाली लिंगायत हीसुद्धा सहभागी झाली. मात्र तिला उपउपांत्य फेरीत पुष्करणी भट्टडकडून पराभव पत्करावा लागला. 

आकांक्षाने केलेल्या कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन, आमदार शेखर निकम, सुभाष बने, आमदार प्रसाद लाड आणि सुचय अण्णा रेडीज, आमदार उदय सामंत यांनी अभिनंदन केले. 

थेट प्रक्षेपणासह समालोचन 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या य्‌ूट्यूब चॅनेलवर या सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षपण सुरू होते. तसेच प्रथमच इंग्रजीमध्ये समालोचनही चालू करण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्यवाह अरुण केदार यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

आकांक्षाची भरारी 

मौजे देवडे (ता. संगमेश्‍वर) येथील आकांक्षा ही रा. भा. शिर्के प्रशालेत शिकते. श्रीलंका इंडो मालदीव येथे भारतीय संघातून कॅरम स्पर्धेत सहभागी झाली. ती आतापर्यंत चार राष्ट्रीय स्पर्धा खेळली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळविले आहे. ती रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्काराने सन्मानित आहे. जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT