Areca nut products sakal
कोकण

वैभववाडी : करवंटी, सुपारीच्या वस्तू जागतिक बाजारात

टाकाऊ करवंटी आणि सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या विविध पर्यावरणपुरक शोभिवंत आणि वापरातील वस्तूंना जागतिक पसंती मिळाली

एकनाथ पवार

वैभववाडी : टाकाऊ करवंटी आणि सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या विविध पर्यावरणपुरक शोभिवंत आणि वापरातील वस्तूंना जागतिक पसंती मिळाली आहे. आतापर्यंत देशभरातील विविध बाजारपेठांबरोबरच अमेरिका आणि इंग्लडपर्यत या दर्जेदार वस्तू पोहोचल्या आहेत. ही किमया परूळे (ता.वेंगुर्ले) प्रथमेश नाईक यांनी करून दाखविली आहे.

कोकणात नारळ आणि सुपारी लागवडीखाली मोठे क्षेत्र आहे; परंतु नारळातील खोबरे काढुन घेतल्यानंतर करवंटीचा सर्ऱ्हास सर्पणासाठी वापर केला जातो. नारळांच्या झावळांपासुन केरसुणी बनविल्या जातात. मागील काही वर्षांत नारळ सोडणांपासून काथ्या निर्मितीचे प्रकल्प देखील उभे राहिले आहेत. सुपारीच्या तर केवळ फळाचाच वापर केला जातो. सुपारीची पाने वायाच जातात; परंतु जिल्ह्यातील परूळे येथील प्रथमेश नाईक यांनी सिध्द ॲग्रो कंपनीची स्थापना करीत या कंपनीच्या माध्यमातुन करवंटी आणि सुपारीच्या पानांपासून विविध वस्तूंची निर्मिती केली आहे. सुपारीच्या पानांपासून पर्यावरणपुरक पत्रावळी, नाष्ट्यांच्या डिश, द्रोण, बाऊल्स, चमचे अशी विविध उत्पादनांची निर्मिती करीत थर्माकॉलच्या वस्तूंना त्यांनी पर्यावरणपुरक वस्तुंचा सक्षम पर्याय निर्माण केला आहे.

सुरूवातीच्या काळात त्यांना या उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले; परंतु जसेजसे या वस्तूची उपयुक्तता ग्राहकांना समजू लागली तसतशी या वस्तुची विक्री आपसुकच वाढत गेली. करवंटीपासुन तयार केलेल्या शोभिवंत वस्तुंना राज्यांसह देशात मागणी आहेच; परंतु जागतिक पातळीवर देखील मोठी पसंती मिळाली आहे. अमेरिका, इंग्लडमध्ये त्यांच्या वस्तू निर्यात होतात. शेकडो पर्यटक पर्यावरण वापरातील वस्तू आणि शोभिवंत वस्तू परूळे येथे येत खरेदी करतात. या त्यांच्या प्रयोगाचा शेतकऱ्यांना देखील फायदा झाला आहे. सुपारीची पाने शेकडा ६० ते ८० रुपयाने खरेदी करतात. शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन ते खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. यापुर्वी हॉटेल व्यावसायिक करवंटी फेकुन द्यायचे; परंतु करवंटीपासुन शोभिवंत वस्तु बनविण्यास सुरूवात केल्यापासुन या करवंट्या ते खरेदी करतात. गेली अकरा वर्ष ते व्यवसायात आहेत.

करवंटीपासून विविध वस्तू बनविण्याचा प्रयत्न होता; परंतु व्यावसायिक शेड्युलमधुन पुरेसा वेळ मिळत नव्हता. लॉकडाउनमुळे तो वेळ मिळाला. या कालावधीत एका पाठोपाठ एक सरस आणि शोभिवंत वस्तू बनविल्या. लॉकडाऊन नंतर या वस्तू बाजारपेठेत नेल्या त्याला ग्राहकांनी पंसली दिली.

- प्रथमेश नाईक

करवंटीपासून शोभिवंत सायकल

करवंटीपासून विविध आकर्षक वस्तू श्री. नाईक यांनी बनविल्या आहेत; परंतु त्यांनी बनविलेली शोभिवंत सायकलची मात्र खुपच चर्चा झाली. कॅन्डल स्टॅन्ड, पेन स्टॅन्ड, सायकल, स्कुटर, चहा कप, विविध भांडी, बाऊल्स, चमचे, सोलकढी, सुपकरीता चमचे, आइस्क्रिम कप, विविध आकाराची तबके तसेच अलीकडेच त्यांनी कोकनट किचैन तयार केले आहे.

  • दर्जेदार वस्तू बनविण्यावर भर

  • कलात्मकता आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती

  • निर्यातदारांच्या माध्यमातून अमेरिका इंग्लंडमध्ये वस्तू

  • मुंबई, पुणे, धुळे, अमरावती, जळगाव, कर्नाटक, कोल्हापूर, केरळ या भागात माल पुरवठा

  • स्थानिकांना रोजगार उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT