Artisans also built sanitizer tunnel in ratnagiri kokan marathi news 
कोकण

वेळेचा सदुपयोग - एसटीच्या कारागिरांनी बनवले सॅनिटायझर टनेल...

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी :  कोरोना (कोविड-19) विषाणूचा फटका सार्‍या जगाला बसला आहे. टाळेबंदीमुळे सर्व यंत्रणा बंद आहेत. अत्यावश्यक एसटीची सेवाही बंद आहे. पूर्वतयारी म्हणून एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील कारागिरांनी उपलब्ध साहित्य व पाच हजार रुपये खर्चातून सॅनिटायझर टनेल साकारण्याची किमया साधली आहे.


पाचशे लिटरच्या पिंपात सॅनिटायझर लिक्विड ठेवले आहे. त्यातून अर्ध्या अश्‍वशक्तीच्या (एचपी) पंपाद्वारे ते समोरच तयार केलेल्या टनेलमध्ये जाते. टनेलमध्ये जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने बटण दाबल्यावर लिक्विडचा फवारा सुरू होतो. सुमारे 10 सेकंद फवारा सुरू राहतो व आपोआप बंद होतो. या युनिटसाठी 3200 रुपयांचा अर्ध्या अश्‍वशक्तीचा पंप, 1300 रुपये सिस्टीम खर्च, 600 रुपयांचे हिरवे कापड वापरले. यासाठी लागणारा टायमर जुन्या एसटीच्या गाड्यांमधील वापरला. टनेलसाठी लागणारी फ्रेमसुद्धा जुन्या सामानातून बनवली आहे.

उपलब्ध साहित्य व कमी खर्चात साकारले​

रत्नागिरी एसटी विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता श्री. जगताप व उपयंत्र अभियंता रमाकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही सॅनिटायझर टनेल कारागीर दिलीप सुर्वे, गौरेश नेवरेकर, राजेश मयेकर, विनायक साळुंखे, ललित काळे, ओंकार शितप, इरशाद मुकादम, जाविद कोतवडेकर यांनी मेहनत घेतली.

जगभरात कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात सलग दोन वेळा टाळेबंदी जाहीर झाली आहे. आता 3 मेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, खेड्यापाड्यात जाणारी व अत्यावश्यक सेवा असणारी एसटी सेवा इतिहासात प्रथमच सुमारे 40 दिवस बंद राहणार आहे. वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा अशा जाहिराती पाहून या कारागिरांनीही सॅनिटायझर टनेल तयार करण्याचे ठरवले.

कणकवली, कोल्हापूरमध्ये साकारले

विभागीय कार्यशाळेत दोन दिवसांपूर्वी हे टनेल साकारले आहे. कोरोना विषाणू स्टील, लोखंड, पत्रा आदीवरही राहू शकतो. कारागिरांचे काम याच्याशी निगडीत असल्याने पूर्वतयारी म्हणून हे टनेल बनवून घेतले आहे. यापूर्वी कणकवली, कोल्हापूर येथेही टनेल बनवल्याचे व्हिडिओ या कारागिरांनी पाहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT