Crime News Esakal
कोकण

Chiplun : मोबाईलमधील SIM Card परत मागितलं म्हणून पती-पत्नीच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार; दोघे गंभीर जखमी

याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जाधवने काटकर यांना शिवीगाळ करून तुला बघतोच अशी धमकी दिली.

चिपळूण : मोबाईलमध्ये असलेले सीमकार्ड (Mobile SIM Card) परत मागितल्याच्या रागातून एका व्यक्तीने पती-पत्नीच्या डोक्यात कोयतीने वार केल्याची घटना १९ ऑक्टोबरला सायंकाळी निवळी-शिर्केवाडी येथे घडली. या मारहाणीत ते दोघेही गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र शांताराम जाधव (रा. ढोबवाडी, कुटरे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याची फिर्याद लक्ष्मण किसन काटकर (रा. शिर्केवाडी, निवळी, मूळ रा. अस्तान, खेड) यांनी दिली आहे.

लक्ष्मण काटकर व महेंद्र जाधव हे निवळी-शिर्केवाडी येथे आंबा, काजूच्या बागेत साफसफाईच्या कामासाठी वास्तव्य करतात. महेंद्र जाधव याचा मोबाईल कुटरे-ढोबवाडी येथून हरविला होता. तो लक्ष्मण काटकर यांच्या नातेवाईकाला आढळून आल्याने तो मोबाईल महेंद्र जाधव याला देण्यात आला.

लक्ष्मण काटकर यांनी महेंद्र जाधव याला ‘तुझ्या मोबाईलमध्ये असलेले सीमकार्ड माझे असून मला परत दे’ असे सांगितले. त्याचा राग येऊन जाधवने काटकर यांना शिवीगाळ करून तुला बघतोच अशी धमकी दिली. कोयतीने त्यांना वार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BR Shetty: एका रात्रीत नशिब बदललं; 880000000000 रुपयांची कंपनी फक्त 74 रुपयांना विकली; आता कोर्टाने ठोठावला 408 कोटींचा दंड

Diwali Sweets Alert: दिवाळीत खवा शुद्ध की भेसळयुक्त आहे कसा ओळखायचा? वाचा एका क्लिकवर

Kadamwakvasti fire: 'कदमवाकवस्ती येथील जेके सेल्सच्या गोडाऊनला भीषण आग; २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक..

Latest Marathi News Live Update : वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Belagav Bank Election : 18 मतदारांना नामांकित हॉटेलमध्ये ठेवले डांबून? मतदान केंद्रापर्यंत जाण्यासही अडवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT