Awaiting Truck Terminal Mahad Industrial Arean Inconvenience of drivers for 37 years raigad
Awaiting Truck Terminal Mahad Industrial Arean Inconvenience of drivers for 37 years raigad sakal
कोकण

Truck Terminal : महाड औद्योगिक क्षेत्राला ट्रक टर्मिनलची प्रतीक्षा

सुनील पाटकर

महाड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्र विकसित करताना कारखान्यांना सोयीसुविधा देणे बंधनकारक आहे. त्‍यापैकीच एक म्हणजे ट्रक टर्मिनल. कंपन्यामध्ये येणारी अवजड वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनलची गरज असते, परंतु महाड येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करून ३७ वर्षांचा काळ लोटला तरी महाड औद्योगिक क्षेत्राला अजूनही ट्रक टर्मिनलची प्रतीक्षा आहे.

ट्रक टर्मिनल अभावी वाहनचालक व कारखानदारांची मोठी गैरसोय होत असून अवजड वाहने औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग केली जात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

महाड एमआयडीसीत लहानमोठे सुमारे २०० कारखाने असून कारखान्यातील मालाची आवक-जावक करण्यासाठी विविध ठिकाणांहून हजारो ट्रक, टँकर, ट्रॉली, क्रेन आणि इतर अवजड वाहने ये-जा करतात.

कंपनीत येणाऱ्या सामानाची चढउतार करण्यास वेळ लागत असल्याने वाहनांना कंपनीत त्वरित परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ट्रकचालकांना वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनलची सुविधा दिली जाते. ट्रक टर्मिनलमध्ये वाहने पार्किंग, देखभाल-दुरुस्‍ती, वेटिंग रूम, स्वच्छतागृहे, उपहारगृहे अशा सुविधा दिल्या जातात.

महाडमध्ये १९८५ च्या दरम्‍यान एमआयडीसी उभी राहिली. त्यानंतर अतिरिक्त क्षेत्रही विकसित झाले. सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रात रासायनिक व औषधनिर्माण कारखाने उभे राहिले आहेत. औद्योगिक क्षेत्र विकसित करताना गरजांनुसार आराखडा तयार करून जागा आरक्षित केले जाते. त्यानुसार ट्रक टर्मिनलची गरज लक्षात घेऊन जागा आरक्षित ठेवण्यात आली. मात्र या ठिकाणी ३५ वर्षांत ट्रक टर्मिनल उभे राहिले नाही.

महाडमधून बिरवाडी आणि परिसरात एसटी वाहतूक, रिक्षा, आणि इतर वाहनांची कायम वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ट्रक टर्मिनलकरिता महाड एमआयडीसीमध्ये अग्निशमन दलाजवळच सुमारे २२ हजार चौरस मीटरचा भूखंड १९९९ मध्ये आरक्षित करण्यात आला होता.

त्‍याठिकाणी ट्रक टर्मिनल उभे राहणे अपेक्षित असताना, तो खासगी कंपनीला कसा गेल्‍याची चर्चा आहे. हा भूखंड ट्रक टर्मिनलकरता हस्तांतरित करण्याची मागणी एमआयडीसीने केली आहे. सध्या ही जागा मोकळी असल्याने काही चालक याठिकाणी वाहने उभी करतात. परंतु ट्रक टर्मिनल मात्र अद्यापही उभे राहिलेले नाही. याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संतोष करंडे यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

वाहतूक कोंडी

जिल्‍ह्यात महाडसह रोहा-धाटाव, रसायनी-पाताळगंगा, माणगावमध्ये विळे, खोपोलीसह पनवेल तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्र असून हजारो रासायनिक कंपन्या याठिकाणी आहेत. मात्र ट्रक टर्मिनल नसल्‍याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

रस्‍त्‍याच्या दुतर्फा वाहने

1 मुंबई-गोवा महामार्गावर नडगाव ग्रामपंचायत कार्यालय ते नांगलवाडी फाट्यापर्यंत दुतर्फा वाहने उभी केली जातात. महाड नांगलवाडी ते एमआयडीसी हा मार्ग संपूर्णपणे अवजड वाहनांनी व्यापला आहे.

2 बिरवाडी, आसनपोई, जीते, टेमघर, कांबळे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कंपन्यांसमोर कायम अवजड वाहने उभी करावी लागत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना व वाहनांना त्रास सहन करावा लागतो.

3 वाहने उभी करण्यास, चालकांना बसण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा कंपनीच्या आवारातच रस्त्यालगत जेवण बनवण्याची आणि खाण्याची वेळ त्‍यांच्यावर येते.

एमआयडीसीची स्‍थापना - १९९९

एकूण क्षेत्र - ९०० हेक्टर

कारखाने - २००+

ट्रकटर्मिनलचा आरक्षित भूखंड -२२ हजार चौमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT