मुरूड आगारातील नियंत्रण कक्षाची दुर्दशा झाली आहे. 
कोकण

मुरूड आगारातील नियंत्रण कक्षाची दुर्दशा; प्रवाशांकडून दुरुस्तीची मागणी

मेघराज जाधव

मुरूड : जूनमध्ये आलेल्या चक्रीवादळात मुरूड आगारातील नियंत्रण कक्षासह अन्य कक्षांचे छप्पर उडून गेले आहे. मात्र, पाच महिने उलटले तरी येथील छप्पर बसवण्यात आलेले नाही. याशिवाय, येथील भिंतींना तडे गेल्याने कक्षाची दुर्दशा झाली आहे. सध्या अनलॉकनंतर आगारातून शिर्डी, धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू केल्या आहेत. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. असे असताना शेडची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मुरूड आगारातून लवकरच 100 टक्के फेऱ्या सुरू होतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय मुरूड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे पर्यटकांची संख्याही अधिक असते. सध्या अनेक जिल्ह्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, जूनच्या चक्रीवादळात आगारातील नियंत्रण कक्षासह अन्य विभागांतील कक्षांचे छप्पर उडून गेल्याने दुर्दशा झाली आहे. पाच महिने झाले तरी छप्पर वा दुरुस्ती करण्यात आली नाही. नियंत्रण कक्षातील भिंतीचे प्लास्टर निघाले असून, तडेही गेले आहेत. तर काही अनेक ठिकाणी गळतीही सुरू झाली होती. परिणामी, दुर्घटना घडण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

यासाठी पाच महिन्यांपासून बंद प्रवासी बैठकीसाठी केलेल्या शेडमधूनच येथील कर्मचाऱ्यांना कारभार करावा लागत आहे. त्यामुळे येथील कक्षाची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. याशिवाय, आगारातील प्रवेशद्वारासमोरच झालेले खड्डे बुजवण्याची आवश्‍यकता आहे. याविषयी प्रवासी संघटनेचे मुरूड तालुकाध्यक्ष श्रीकांत सुर्वे लवकरच दुरुस्तीसंदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देणार आहेत. 

मध्यवर्ती कार्यालयाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे. निविदा प्रक्रिया या कार्यालयातूनच निघत असल्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- सनील वाघचौरे, आगार व्यवस्थापक, मुरूड  


(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

Pune News: चिखली-कुदळवाडीनंतर मोईतही प्रशासनाचा बुलडोझर; अवैध भंगार व्यवसायावर कारवाई, खेड तालुक्यात प्रशासनाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT