bank robbery in dapoli kokan marathi news 
कोकण

जबरदस्त प्लॅनिंग तरीही हॅकर अडकला दापोलीच्या 'या' बॅक सिक्युरिटीच्या जाळ्यात....

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : संपूर्ण राज्यात टेबल बँकिंग सेवेमुळे प्रसिद्धीस आलेल्या दापोली अर्बन बँक दापोलीच्या सिस्टीम मध्ये अनधिकृत प्रवेश करून अज्ञात हॅकरने बँकेला सुमारे 48 लाख रुपयांना फसविण्याचा प्रयत्न केला होता मात्र बँकेची फायर वॉल सिस्टीम मजबूत असल्याने व सुट्टीच्या दिवशी एनइएफटी सुविधा बंद असल्याने हॅकरचा हा प्रयत्न फसला आहे, या घटनेची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. असून, दापोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

दापोली अर्बन बँकेच्या संगणकीय सिस्टीममध्ये शनिवार ता. 15 रोजी रात्री व रविवार ता.16 रोजी  अज्ञात इसमाने प्रवेश करून बँकेच्या खेर्डी(ता.चिपळूण) शाखेतील बंद असलेले चालू खाते (करंट अकाउंट)  पुनर्जीवित करून या खात्याच्या नोंदीत 3 कोटी रुपये जमा दाखविले. यानंतर या खातेदाराच्या खात्यात एक मोबाईल क्रमांक ऍड करून या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बँकेचे मोबाईल app.ची सुविधा त्याने स्वतःच जनरेट करून त्यानंतर देशातील विविध बँकाच्या शाखांत एनइएफटी ची 24 ट्रान्झक्शन करून या सुरू केलेल्या खात्यातून सुमारे 47 लाख 93 हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्याचा प्रयत्न केला. यात अज्ञाताने एका दिवशी एका खातेदाराला  एनइएफटी करण्याची  लिमिट 5 लाख रुपये असताना हे लिमिटही क्रॅक केले.

सहाय्यक व्यवस्थापकामुळे टळसा अनर्थ
सोमवार ता.17 रोजी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) शिरीष घाणेकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर मोबाईल बँकिंग सुविधा व एटीएम सुविधा तात्काळ बंद करण्यात आली असून या सायबर हल्ल्यात बँकेचे एक रुपयाचेही नुकसान झालेले नसल्याचे बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांनी सांगितले असून खातेदारांना घाबरून जाऊ नये असे आवाहन जालगावकर यांनी केले आहे.या प्रकारामुळे पुण्याच्या कॉसमॉस बँकेमध्ये झालेल्या सायबर हल्ल्याची आठवण ताजी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT