bjp
bjp sakal
कोकण

4 जुन्या बड्या पदाधिकाऱ्यांची बंडखोरी भाजपला भोवणार? अपक्ष जोमात

सकाळ वृत्तसेवा

भाजपत उघडपणे अंतर्गत गटबाजी झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीत होण्याची शक्यता

कुडाळ : येथील नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जुन्या निष्ठावंत भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी पक्षाला भोवणार आहे. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस व भाजप या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी रिंगणात उतरत अधिक रंगत वाढवली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ भाजपत उघडपणे अंतर्गत गटबाजी झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. काही इच्छूक उमेदवारांनी पक्षांतर करीत उमेदवारी मिळवली.

कुडाळ नगरपंचायतीचा निवडणुक रणसंग्राम जोरात सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता. ७) शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच धावपळ उडाली. सुरूवातीला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनीनंतर भाजप व राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सोमवारी (ता. ६) सतरापैकी दहा उमेदवार जाहीर करीत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित उमेदवारांची नावे मंगळवारी सकाळी घोषित केली.

भाजपने सोमवारी रात्री सतराही प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर केली. यात माजी नगरसेविका उषा आठल्ये व महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, साक्षी सावंत वगळता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली; मात्र यात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात आल्याने निष्ठावंत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये बंड पाहायला मिळाले. पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत यादीत निष्ठावंत मूळ भाजपच्या इच्छूक कार्यकर्त्यांची नावेच नसल्याने अखेर त्यांनी ऐनवेळी बंडाचे निशाण पुकारले. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने एबी फॉर्म दिला तर पक्षातून अन्यथा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला. यात प्रभाग ४ बाजारपेठमधून भाजपाच्या महिला शहराध्यक्षा ममता उर्फ मृण्मयी चेतन धुरी तर प्रभाग क्रमांक ६ गांधी चौकमधून अदिती अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आठल्ये यांनी प्रभाग क्रमांक १३ श्रीरामवाडीतून पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारली. त्यामुळे या बंडखोरीचा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एमआयडीसी प्रभागातून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विजय कांबळी इच्छूक होते; मात्र तेथे भाजपने सुधीर चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने कांबळी नाराज असल्याची चर्चा आहे. जिल्हा चिटणीस अनिल उर्फ बंड्या सावंत यांच्या पत्नी अदिती सावंत भाजपकडून इच्छूक होत्या; मात्र अधिकृत घोषित केलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

शक्तीकेंद्र प्रमुख राजू बक्षी यांच्या पत्नी शैला बक्षीही इच्छूक होत्या; मात्र त्यांचाही भाजपने पत्ता कट केल्याने तेही नाराज असल्याची चर्चा होती. नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक सुनील बांदेकरही भाजपमधून इच्छूक होते. त्यांचाही पत्ता कट झाल्याने तेही नाराज असल्याने त्यानी बंडाचे निशाण उगारले आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे यांनी भाजपमधून अभिनवनगर प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रज्ञा राणे यांचे पती माजी सरपंच प्रशांत राणे यांनाही भाजपने कुंभारवाडी प्रभागातून उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीपासून फारकत घेतलेल्या राष्ट्रीय काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्या पुजा पेडणेकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून तर माजी नगरसेविका प्रज्ञा राणे यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भाजप यांच्या तोडीसतोड राष्ट्रीय काँग्रेसनेही आपले उमेदवार रिंगणात उतरविल्याने हि निवडणूक लक्षवेधी होणार आहे. मनसेने एक रमा नाईक यांना उमेदवारी दिली आहे. अन्य ठिकाणी मनसेचे उमेदवार नसल्याने ते कोणाला साथ देणार हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे राष्ट्रीय काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार जाहीर करीत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा पुजा पेडणेकर यांना राष्ट्रीय काँग्रेसने भैरववाडी प्रभागातून उमेदवारी देत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनाही राष्ट्रीय काँग्रेसने कुंभारवाडी प्रभागातून उमेदवारी देत त्यांच्यासह गणेश भोगटे समर्थक अन्य दोन उमेदवारांना काँग्रेसने उमेदवारी दिली. नगपपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या इच्छूक उमेदवारांनी पक्ष बदल केल्याने त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी प्रभाग क्रमांक सतरा सांगिर्डेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती सुनील भोगटे व शिवसेनेच्या सौ. तेजस्वी परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे याठिकाणी दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक एक कविलकाटेमधून शिवसेनेने सोमवारी सौ. मनाली महेंद्र वेंगुर्लेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत यादीत ज्योती रविंद्र जळवी यांची उमेदवारी शिवसेनेने घोषित केली. त्यामुळे आता वेंगुर्लेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हिंदू कॉलनी प्रभागातून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर व भाजपाकडून महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याठिकाणची लढत प्रतिष्ठेची झाली आहे.

"शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीत येण्यासाठी काँग्रेसकडे विनंती केली होती; मात्र त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करावी. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आदेश आल्यास आम्ही आघाडीसोबत जाण्याचा विचार करू; मात्र सध्या तरी आमचे उमेदवार निवडणूक मैदानात उरविले आहेत."

- अभय शिरसाट, प्रभारी तालुकाध्यक्ष, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT