konkan
konkan esakal
कोकण

अखेर 'ब्लॅक पॅंथर' आईच्या कुशीत; वनविभागाचं कौतुक

सकाळ वृत्तसेवा

ब्लॅक पॅन्थरची पशुवैद्यकीय अधिकारी, कुडाळ यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली असता तो सुदृढ असल्याची खात्री झाली.

कुडाळ : येथे सापडलेला ब्लॅक पॅन्थर अखेर त्याच्या आईच्या कुशीत विसावला. सिंधुदुर्गच्या वनविभागाने यासाठी बरीच मेहनत घेतली. सिंधुदुर्गाचे वैभव व वेगळेपण सांगणारा हा अत्यंत दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर वनविभागाने वाचविला होता. त्याच्या आईची पन्हा भेट घडवून दिल्याने वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या घटनेवरून वन्यप्राण्यांबाबत सिंधुदुर्गवासीयांचे आपलेपणा व प्रेम यामुळे येथील जैवविविधता समृद्ध झाल्याचे दिसते.

गोवेरी-तेंडोली (ता. कुडाळ) येथील विजय प्रभूखानोलकर यांच्या आंबा-काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये ११ नोव्हेंबरला सकाळी हा ब्लॅक पॅन्थर सापडला. येथील वनपरिक्षेत्र बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टाकीत पहाणी केली असता तो (ठिपक्याचा) नियमित बिबट नसून, काळया रंगाचा असल्याची खात्री झाली. बचाव पथकाने शिताफीने पाऊल उचलत त्याला रेस्क्यु करण्याच्या हालचालींना वेग दिला. स्थानिकांच्या मदतीने या ७ ते ८ फूट टाकीमध्ये पिंजरा सोडत त्यास पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर त्या ब्लॅक पॅन्थरची पशुवैद्यकीय अधिकारी, कुडाळ यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली असता तो सुदृढ असल्याची खात्री झाली.

मादी प्रजातींच्या या ब्लॅक पॅन्थरचे वय सुमारे ८ ते १२ महिने असल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन सुनिल लिमये तसेच कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनवृत्त डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बछड्याची त्याच्या आई सोबत पुर्नभेट करुन देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार उपवनसंरक्षक (प्रा.) वनविभाग सावंतवाडी शहाजी नारनवर यांनी त्यावर निर्णय घेत तशा सूचना वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकास दिल्या. वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने पुणे येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने संबंधित संभाव्य ठिकाणी रेस्क्यु केलेल्या मादी बछड्याच्या आईचा शोध घेण्यास सुरवात केली. यासाठी ठीक-ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावत त्याच्या हालचाली टिपण्यास सुरवात केली.

एका ठिकाणी त्या बछड्याच्या आईचा (मादी) वावर दिसून आला. तिथे बछडा व आईची भेट करुन देण्याच्या कार्यवाहीला वेग आला. ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले. त्या दिवशी सायंकाळी वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने वैदयकिय अधिकारी कुडाळ यांच्याकडून पिंजऱ्यात असलेल्या त्या बछड्याची तपासणी करुन आईचा (मादी बिबट) वावर असलेल्या परिसरात मुक्त करण्यासाठी त्या मादी बछडयास पिंजऱ्यासहीत नेण्यात आले. तिथे रेस्क्यू पुणे टीमची तांत्रिक मदत घेत आई (बिबट) च्या प्रतिसादाची प्रतिक्षा सुरु झाली.

अथक प्रयत्नाने रात्री उशिरा आईने पिंजऱ्यातील आपल्या पिल्लाचा अंदाज घेतला; परंतु हुलकावणी देत तिथून ती परांगदा झाली. पिंजऱ्याजवळ येऊन तिने दर्शन दिल्याने बचाव पथकाच्या आशा पल्लवित झाल्या. पुन्हा जोमाने आई व पिल्लूची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, सावंतवाडी उपवनसंरक्षक नारनवर हे स्वतः रात्री उपस्थित होते. त्यांच्या समक्ष आई पिंजऱ्यातील पिल्लाजवळ येताच पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा पिल्लू आईला बिलगले व आपल्या उर्वरीत आयुष्याचा आनंदी प्रवास पुन:श्च सुरु केला.

बचावकार्य-पुर्नभेट प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन लिमये यांच्यासह डॉ. बेन, श्री. नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी आय. डी. जालगावकर तसेच मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार व महादेव भिसे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षिरसागर, वनपाल धुळु कोळेकर, अण्णा चव्हाण, श्रीकृष्ण परीट, वनरक्षक सावळा कांबळे, सूर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर यांनी रेस्क्यू पुणे संस्थेच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.

"ब्लॅक पॅन्थर ही बिबट प्रजातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात मेलॅनिन (Melanin) रंगद्रव्य (Pigments) तयार झाल्याने व जनुकिय बदलांमुळे त्याचा रंग काळा दिसून येतो. जिल्ह्यातील या अतिशय दुर्मिळ अशा काळ्या रंगाच्या बिबट्याला (ब्लॅक पॅन्थर) जिल्ह्यातील वनविभागाने यशस्वी रेस्क्यु केले. तसेच नियोजनबद्धरित्या त्याला निसर्ग अधिवासात सोडले."

- अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT