chiplun
chiplun sakal
कोकण

चिपळूण : ब्रिटिशकालीन पूल होणार जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : अतिवृष्टी कालावधीत नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून पुराला कारणीभूत ठरत असलेले येथील बाजार पूल व बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल हे दोन्ही ब्रिटिशकालीन पूल (British era bridge)आता जमीनदोस्त होणार आहेत. जिल्हाधिकारी बी. एन पाटील यांनी पूल पाडण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार बाजार पूल हा पालिका आणि बहादूरशेख नाका पूल सार्वजनिक बांधकाम विभाग तोडणार आहे. नदीप्रवाहाला अडथळे निर्माण करणारे अन्य काही बांधकामे, उंचवटेही काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

गाळ काढण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्या वेळी येथील काही बांधकामे पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण करीत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्टपणे पुढे आले. त्यामध्ये प्रामुख्याने चिपळूण शहरातील जुना बाजारपूल तसेच बहादूरशेख येथील जुना वाशिष्ठी पूल या दोन पुलांचा समावेश आहे. जुना बाजारपुलाची उंची कमी असल्याने नदी दुथडी भरून वाहू लागताच पाण्याचा प्रवाह या पुलावर धडकून थेट आपली दिशा बदलतो. या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल असल्याने पाण्याच्या प्रवाहाला थेट पुढे जाण्यासही अडथळा निर्माण होतो. पाणी थेट शहरात शिरते. तोच प्रकार बहादूरशेख येथील जुना वाशिष्ठी पुलाबाबत होत आहे. हा पूल उंच असला तरी पुलाचे पिलर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही पुलावरून आता वाहतूक बंद आहे. तसेच ते जीर्ण आणि कमकुवत झालेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.(Kokan news)

जबाबदारी चिपळूण पालिकेवर

जुना बाजार पूल काढून टाकण्याची जबाबदारी चिपळूण पालिकेवर सोपवली आहे; तर बहादूरशेख नाका येथील जुना पूल तोडण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणार आहे. त्यामुळे चिपळूणमधील हे दोन्ही ब्रिटिशकालीन पूल नामशेष होणार आहेत. अतिवृष्टीत पावसाच्या पाण्याबरोबर खाली येणारी माती जर थांबवली तर गाळाला मोठा प्रतिबंध करता येणे शक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT